Loksabha Election 2024 : महायुतीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोणाची उमेदवारी असणार हे अजून निश्चित नाही. सध्या तरी ही जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) असल्याचे सांगितले जात असले तरी उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी रणनीती ठरवण्याचा मेळावा घेतला असला, तरी त्या पाठीमागे काही ना काही बीजे पेरली जात आहेत. हे नक्की आहे.
मात्र, पुन्हा एकदा खासदार संजय मंडलिक(Sanjay Mandlik) यांनी आपल्या उमेदवारीवरून गॅरंटी देत सूचक विधान केले आहे. कागल तालुक्यातील बिद्री येथे झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यातील शिंदे शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिला आहे. त्यामुळे आपण 100 टक्के लोकसभेच्या मैदानात असणार आहे. आपले कार्यकर्ते आतापासून कामाला लागलेत, त्यामुळे आता माघार घेणार नाही. आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही. निवडणुकीचे रिंगण आपल्याला नवीन नाही, असा सूचक इशारा खासदार संजय मंडलिक यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष विस्ताराचा हक्क आहे. यात काहीही नवल नाही. मात्र, विद्यमान म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर सर्वजण मिळून माझ्या विजयासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी खासदार मंडलिकांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यावरून मंडलिक यांनी कुपेकर हे आपले जुन्या काळातील सहकारी आहेत. मागील अडीच वर्षांच्या काळात महायुतीत एकत्र असल्यापासून कुपेकर कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत.
परंतु त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून मी त्यांच्या शेताचा रस्ता केला आहे. आपल्याबाबत त्यांचे काही गैरसमज असल्यास समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज दूर करणार असून, त्यांनी आपल्या कामाची आधी माहिती घेऊन मगच आपल्या उमेदवारीला विरोध करावा, असे आवाहन खासदार मंडलिकांनी केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.