Kolhapur Lok Sabha Constituency : 'साखरपुडा झाला; पण लग्न झालं नाही', असं सतेज पाटील कोणाबद्दल म्हणाले !

The strength of Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीची ताकद बेदखल करून चालणार नाही
Satej Patil Raju Shetti
Satej Patil Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : सहा खासदारांबद्दल पूर्वीपासूनच साशंकता निर्माण झाली आहे. यापुढे काही गोष्टी घडणार आहेत. उमेदवारी बदलापर्यंत गोष्टी घडणार आहेत. भाजप कशा पद्धतीने वापरून घेत आहे हे समोर आले आहे, अशा शब्दांत शिंदे गटाच्या उमेदवार बदलावरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी टीका केली आहे. भावना गवळी आणि हेमंत गोडसे यांचे शिवसेना शिंदे गटाने तिकीट कपल्यानंतर आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हातकणंगले लोकसभा (LokSabha) मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानंतर सतेज पाटील यांनी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. शेट्टी आणि ठाकरे यांच्यात चर्चा होती. मात्र, शेट्टीच्या चर्चेला अंतिम स्वरूप आले नाही. महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात आहे. शिरोळ, हातकणंगले, शिराळा, शाहूवाडी, वाळवा आणि इस्लामपूरमध्ये ताकद आहे. शेट्टींनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. साखरपुडा झाला; पण लग्न झालं नाही, अशा शब्दांत शेट्टी यांच्यावर निशाणा साधत फटका कोणाला बसणार हे सांगता येणार नाही. पण महाविकास आघाडीची ताकद बेदखल करून चालणार नाही, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satej Patil Raju Shetti
NCP Dispute : अजित पवारांना मोठा दिलासा! अवमानाचा ठपका ठेवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सांगलीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल. विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. यातून लवकरच मार्ग निघेल यात शंका नाही. ज्या पद्धतीने नवनीत राणा यांना न्याय मिळाला, त्याच पद्धतीने आमच्या रामटेकच्या उमेदवाराला मिळावा. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आम्हालाही रामटेकमध्ये न्याय मिळेल असे आम्हाला अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmer) उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हा महामार्ग केला जातोय. कोल्हापूर, धाराशिव यासह जिथून हा रस्ता जातो तेथील शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. हा महामार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचा वापर केला पाहिजे. ज्या तीर्थक्षेत्रांना हा मार्ग जोडणार आहे. त्या ठिकाणी हा निधी गेला पाहिजे. महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर पैसे खर्च करा. ठेकेदारांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला.

(Edited By - Chaitanya Machale)

R

Satej Patil Raju Shetti
Lok Sabha 2024 : भाऊ आनंदराज यांच्या मदतीस धावले प्रकाश आंबेडकर; अमरावतीबाबत घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com