Lok Sabha 2024 : भाऊ आनंदराज यांच्या मदतीस धावले प्रकाश आंबेडकर; अमरावतीबाबत घेतला मोठा निर्णय

Lok Sabha Elections 2024 वंचितने राज्यात आपले 24 उमेदवार जाहीर केले आहेत. आपले उमेदवार जाहीर करताना पक्षाच्या वतीने नागपूर, कोल्हापूर, बारामती या जागांवरील महाविकास आघाडीतील उमेदवारांना पाठिंबाही दिला आहे. त्यानंतर त्यांनी आता अमरावतीतून लढणारे बंधू आनंदराज आंबेडकरांनाही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे
Prakash Ambedkar, Anandraj Ambedkatr
Prakash Ambedkar, Anandraj AmbedkatrSarkarnama
Published on
Updated on

Amravati Political News : जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोची भूमिका घेतली. यामुळे राज्यातील काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. काँग्रेसला काही जागांवर मदत करणार असल्याचे सांगितल्यानंतर अमरावती मतदारसंघातून प्रथमच लोकसभा निवडणुकीत Lok Sabha Elections उतरलेले त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष होते.

आता वंचितने अमरावतीतून उमेदवार न देता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकरांना मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. वंचितने Vanchit Bahujan Aghadi राज्यात आपले २४ उमेदवार जाहीर केले आहेत. आपले उमेदवार जाहीर करताना पक्षाच्या वतीने नागपूर, कोल्हापूर, बारामती या जागांवरील महाविकास आघाडीतील Maha Vikas Aghadi उमेदवारांना पाठिंबाही दिला आहे.

त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीतून Amravati लढणारे बंधू आनंदराज आंबेडकरांनाही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना पत्र दिले आहे. Lok Sabha Election contest in Amravati Prakash Ambekar support to Anandraj Ambedkar

पत्रात ठाकूर यांनी अमरावती मतदारसंघात आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करेल. तेथून वंचितने जाहीर केलेला उमेदवार अर्ज भरणार नाही, असे आश्वासित केले आहे. तसेच वंचितने अमरावतीतून घोषित केलेल्या उमेदवाराला अर्ज दाखल करू नये, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसेच आता आपण अर्ज मागे घेऊ नये व उमेदवारी कायम ठेवावी, असे आवाहनही ठाकूर यांनी आनंदराज आंबेडकरांना केले आहे.

Prakash Ambedkar, Anandraj Ambedkatr
Lok Sabha Election 2024 : आंबेडकर बंधू एकाच वेळी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार...

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार नवनीत राणा, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसने आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, गत लोकसभेत अमरावतीतून खासदार राणा यांना पाच लाख 10 हजार 947 मते मिळाली होती. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना चार लाख 73 हजार 996 तर तिसऱ्या क्रमांकावरील वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना 65 हजार 135 मते मिळाली होती.

(Edited by Sunil Dhumal)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com