Kolhapur Loksabha Election 2024 : कोल्हापूर-हातकणंगलेचा कल केव्हा येणार? निकाल कधीपर्यंत लागणार? वाचा सविस्तर...

Kolhapur Lok Sabha Election Update : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 142 व 127 फेऱ्यात निकाल पूर्ण होणार आहे. मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास 504 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha Constituency Sarkarnama

Loksabha Election latest Update : महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान 20 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी देशातील लोकसभेचा निकाल स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले सह 11 लोकसभा मतदारसंघातील मतदान तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी पार पडले. दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांना आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला सुरवात झाली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून दुपारी तीनवाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

मतमोजणीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास 504 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 142 व 127 फेऱ्यात निकाल पूर्ण होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Lok Sabha Constituency
Nilesh Lanke News : नीलेश लंकेंच्या पदाधिकाऱ्यांचा 'ईव्हीएम'वर लक्ष, गोदामाभोवती ठोकला तळ

कोल्हापूर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 252 व हातकणंगलेसाठी (Hatkangale Constituency) 252 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर कोल्हापूर लोकसभेसाठी मतमोजणी रमणमाळा येथील शासकीय गोदामात तर हातकणंगले लोकसभा निवडणुकीची (Loksaba Election) मोजणी राजाराम तलाव येथे करण्याचे नियोजन आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या फेऱ्या

  • कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

  • चंदगड - 27 २७

  • राधानगरी - 30 ३०

  • कागल - 25

  • कोल्हापूर दक्षिण - 23

  • करवीर - 25

  • कोल्हापूर उत्तर - 22


हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

  • शाहूवाडी- 23

  • हातकणंगले- 23

  • शिरोळ- 20

  • इचलकरंजी-18

  • शिराळा-23

  • इस्लामपूर-20

Kolhapur Lok Sabha Constituency
Hasan Mushrif : 100 कोटीच्या रस्त्यांचं राजकारण तापलं, प्रकरण पालकमंत्र्यांवर शेकलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com