Kolhapur Lok Sabha Election : फायद्याच्या आशेवर बसलेल्या संचालकांचे हात रिकामे? केवळ क्षुल्लक निरोप आला अन्...

Kolhapur Lok Sabha Constituency : आता त्याचा फायदा नेमका कोणत्या गटाला होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha Constituency Sarkarnama

Loksabha Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचा महत्त्वाचा पाया आहे. जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला सहकाराच्या माध्यमातूनच खतपाणी मिळत गेले आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्र म्हणून याच सहकारी संस्थांकडे पाहिले जाते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, शेतकरी बाजार समिती, शेतकरी संघ यांच्यासह विविध सेवा सोसायटी बँका आणि पतसंस्था यांचा समावेश होतो. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्यासाठी याच संस्थेच्या संचालक पदावर बसून त्यांचा मान ठेवला जातो.

एकदा का संचालक केला म्हणजे कार्यकर्ता नेता असेपर्यंत त्याच्या मागे ठाम असतो. परिसरातील वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी संचालक पदाचे गोड गाजर कार्यकर्त्याच्या माथी मारले जाते. लोकसभा असो व विधानसभा निवडणूक याच संचालकांना मात्र आर्थिक आमिष दाखवून एकमेकांकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरली. तर जिल्हा बँकेचे काही संचालक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत विदेश दौऱ्यावर गेले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Lok Sabha Constituency
Vishal Patil : सांगलीतील उमेदवार विशाल पाटलांची बदनामी, दोघांविरोधात गुन्हा नोंद

कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात विस्तारलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण बरेचसे सहकारी संस्थांवर अवलंबून आहे. मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर महाविकास आघाडीत एकत्र असलेले नेते युतीत सहभागी झाल्याने जिल्ह्यातील सहकारावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे आपापल्या नेत्याकडे विखुरलेल्या काही संचालकांना मात्र या लोकसभा निवडणुकीने चांगलेच गोंधळात टाकले आहे.

लोकसभेत प्रचार केला तर विधानसभेत अडचण होईल. अडचण झाली तर राजकारण संपेल याच धास्तीने अनेकांनी ही लोकसभा निवडणूक घालवली. शिवाय या निवडणुकीत उलट आपल्या फायद्याचा काय निरोप येईल काय, याकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. तर सहकारातील कर्मचाऱ्यांना केवळ ‘सुटी आहे. मतदान करा,’ केवळ एवढीच नोटीस निघाली.

Kolhapur Lok Sabha Constituency
Hatkanangale Lok Sabha : मतदार यादीतून नावे गायब; हातकणंगलेतील मतदार प्रशासनाला खेचणार कोर्टात

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण गटातटात गुरफटल्याने थेट निरोप आला नाही. त्यामुळे सहकाराच्या व्होट बॅंकेतील अधिकारी- कर्मचारी-सभासदानी बिनधास्त मतदान केले आहे. त्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे आहे. शिवाय ज्या संचालकांची व्होट बँक आहे. त्यातील काही संचालक सुद्धा हातावर घडी घालून शांत होते. कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी मानली जाते. येथे दूध, सेवा सोसायट्यांचे मोठे जाळे आहे. शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा राजकारणाशी अप्रत्यक्षपणे संबंध येतो.

जिल्हा बॅंक आणि गोकुळ जिल्ह्यातील दोन मोठ्या सहकारातील संस्था आहेत. ग्रामीण भागातील गल्लीबोळात त्यांचे थेट सभासद आहेत. यामुळे ही एक वेगळी ‘व्होट बॅंक’ मानली जाते. यामध्ये साखर कारखान्यांतील सभासदांचा वेगळाच गट आहे. स्थानिक नेते हाच त्यांच्यासाठी पक्ष असतो. त्यामुळे स्थानिक आघाडी, गटतट यामध्येच त्यांच्‍या मतांची विभागणी होते. येथे नेत्याला मानले जाते.

Kolhapur Lok Sabha Constituency
Solapur Lok Sabha : सोलापुरात 12 तासांत वाढलेल्या मतांवर काँग्रेसचा संशय; प्रशासनाकडे मागितली 34 हजार मतांची माहिती

विशेष म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर याचबरोबर जिल्हा बॅंक आणि गोकुळमधील संस्थांचे संचालक यांच्यावर हे गट तट अवलंबून आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण आतापर्यंत गटातटावरच होत राहिले आहे. पक्षीय राजकारण बाजूला सोडून इथे गटालाच महत्त्व दिले जाते. मात्र या नेत्यांकडून काय निरोप येईल? याची धास्ती अधिकारी कर्मचारी आणि संचालकांना होती.

मात्र कोणाकडूनही तसा निरोप न आल्याची माहिती आहे. केवळ सुट्टी आहे मतदान करा इतकाच मेसेज आल्याने कर्मचाऱ्यांनी देखील झाडून मतदान केलं आहे . त्याचा फायदा नेमका कोणत्या गटाला होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com