Kolhapur Lok Sabha Update : आजपासून अर्ज छाननी, कोल्हापुरातून 28 तर हातकणंगलेतून 36 उमेदवारांचे अर्ज

Loksabha Election updates : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. आजपासून अर्ज छाननी सुरू होणार आहे. माघारीची अंतिम मुदत सोमवार (ता. 22) पर्यंत आहे.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha Constituency Sarkarnama

kolhapur Loksabha News Update : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात 28 उमेदवारांनी 42, तर हातकणंगलेमधून Hatkangale loksabha 36 उमेदवारांनी 55 अर्ज भरले. शुक्रवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरमधून 13 जणांचे 14, तर हातकणंगलेमधून 16 जणांनी 22 अर्ज भरले. आज अर्जांची छाननी असून, माघारीची अंतिम मुदत सोमवार (ता. 22) पर्यंत आहे.

कोल्हापूर मतदारसंघातील kolhapur loksabh News अर्ज शुक्रवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल करण्यात आले. यामध्ये मालोजीराजे छत्रपती (अपक्ष), बाजीराव नानासाहेब खाडे (अपक्ष), अरविंद भिवा माने (भारतीय राष्ट्रीय दल) यांचा पक्षाकडून एक व अपक्ष एक अर्ज, संजय भिकाजी मागाडे (बहुजन समाज पार्टी), मुश्ताक अजीज मुल्ला (अपक्ष), माधुरी राजू जाधव (अपक्ष), ॲड. यश सुहास हेडगे-पाटील (अपक्ष), कृष्णाबाई दीपक चौगले (अपक्ष), सुभाष वैजू देसाई (अपक्ष), इरफान आबुतालिब चांद (अपक्ष), राजेंद्र बाळासो कोळी (अपक्ष), मंगेश जयसिंग पाटील (अपक्ष), कुदरतुल्ला आदम लतीफ (अपक्ष) यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Loksabha News : मंडलिकांनी काढला जुना विषय; 'त्यांचा' पराभव करण्यासाठी माझ्यासोबत आले...

हातकणंगले मतदारसंघातील अर्ज निवडणूक Election निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आले. यामध्ये राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष), महम्मद मुबारक दरवेशी (अपक्ष), रवींद्र तुकाराम कांबळे (बहुजन समाज पार्टी) यांचे दोन अर्ज, संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी), सत्यजित बाळासो पाटील (अपक्ष), अरविंद भिवा माने (अपक्ष) यांचे दोन अर्ज, राजेंद्र भीमराव माने (अपक्ष), धैर्यशील संभाजी माने (अपक्ष).

तसेच अस्लम ऐनोद्दिन मुल्ला (अपक्ष), लक्ष्मण शिवाजी तांदळे (अपक्ष), विश्वास आनंदा कांबळे (अपक्ष), वेदांतिका धैर्यशील माने (अपक्ष), परशुराम तमन्ना माने (अपक्ष), अस्मिता सर्जेराव देशमुख (अपक्ष), शरद बाबूराव पाटील (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), जावेद सिकंदर मुजावर (अपक्ष), सुनील विलास अपराध (अपक्ष), आनंदराव वसंतराव सरनाईक (अपक्ष), दिनकरराव तुळशीदास चव्हाण (अपक्ष), श्रीमती गोविंदा डवरी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

R

Kolhapur Lok Sabha Constituency
Narendra Modi In Nanded : राहुल गांधींवर हल्ला, 'इंडिया' आघाडीचा समाचार अन् अशोक चव्हाणांचं कौतुक; मोदी काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com