Kolhapur Loksabha News : मंडलिकांनी काढला जुना विषय; 'त्यांचा' पराभव करण्यासाठी माझ्यासोबत आले...

Sanjay Mandalik गेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेना, भाजपचा उमेदवार होतो. त्यामुळे आम्ही कोठे जावे हा विषय नव्हता, तर तेच आमच्याकडे आले होते, अशा शब्दांत मंडलिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
Dhananjay Mahadik, Sanjay Mandalik, Satej Patil
Dhananjay Mahadik, Sanjay Mandalik, Satej Patilsarkarnama

kolhapur Loksabha News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काल सकाळ कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील जुना विषय काढून पुन्हा एकदा वादाला उकळी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार संजय मंडलिक, हे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात होते. पण राजकीय घडामोडीमुळे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आघाडी धर्म फाट्यावर मारून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्न केला होता. तोच विषय म्हटले की यांनी पुढे करून जुन्या वादाला नवी उकळी दिली आहे.

सध्या संजय मंडलिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे महायुतीत आहेत. लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत आमचा फार दोस्ताना होता असे नाही. त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. त्यामुळे ते माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे गेलो नाही’, असा टोला महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

२०१९ च्या निवडणुकीत त्यांची राजकीय गरज होती. त्यामुळे ते मला मदत करायला आले. मी त्यांच्याकडे काही ठरवायला गेलो नव्हतो. यामध्ये आमचा फार दोस्ताना होता असे नाही तर, त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेना आणि भाजपचा उमेदवार होतो. त्यामुळे आम्ही कोठे जावे हा विषय नव्हता, तर तेच आमच्याकडे आले होते, अशा शब्दांत मांडलिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

Dhananjay Mahadik, Sanjay Mandalik, Satej Patil
Kolhapur Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांना अश्रू अनावर; बंडखोरी करत स्थानिक नेत्यांना दिला इशारा

संपर्क नसल्याची टीका करणाऱ्यांवर बोलताना ते म्हणाले, ‘वर्षातून दोन-दोन महिन्यांची तीन अधिवेशने असतात. यामध्ये कामाचे अर्धे दिवस गेले. यातच कोरोना आला. तरीही आम्ही लोकांना भेटत होतो. संजय मंडलिक कुठे दिसत नाहीत, हे अलीकडच्या काळात कोणीतरी खोटा प्रचार करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी कुठे दिसत नाही म्हणून कोल्हापूर जिल्हा बँकेला निवडून आलो का?, ‘गोकुळ’मध्ये पॅनेल कसे विजयी केले?, ‘दक्षिण’मध्ये ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात कोण होते?, ‘बिद्री’ला संपूर्ण पॅनेल तयार केले, त्याला लोकांनी भरघोस मते दिली. त्यामुळे हे सर्व मी कोठे दिसत नाही म्हणून किंवा लोकांमध्ये जात नाही म्हणून दिले का?’ असा सवालही मंडलिक यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

R

Dhananjay Mahadik, Sanjay Mandalik, Satej Patil
Kolhapur Lok Sabha Constituency : यंदाही संदीपचा जलवा, कोल्हापूर लोकसभेसाठी भरला तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com