Kolhapur Mahavikas Aghadi Candidate : कोल्हापुरात 'मविआ'चे उमेदवार ठरले? काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस, ठाकरेंना इतक्या जागा...

Kolhapur Mahavikas Aghadi Candidate for vidhansabha Election : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांमधील महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जवळपास आठ जागांवरील तिढा सुटला आहे.
Kolhapur Vidhan Sabha
Kolhapur Vidhan Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Mahavikas Aghadi Candidate : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांमधील महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जवळपास आठ जागांवरील तिढा सुटला आहे. काँग्रेस चार, राष्ट्रवादी दोन आणि शिवसेना ठाकरे गट दोन अशा आठ जागांवरील प्राथमिक जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. तर शिरोळ आणि इचलकरंजी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील आग्रही असल्याने आणखीन एकेक जागा पदरी पाडून घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आग्रही भूमिका घेतली आहे. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गट कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून अधिक आग्रही असल्याने या जागेवर तडजोड होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार विधानसभेचे तर दोन आमदार विधान परिषदेचे आहेत. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चार मतदारसंघ काँग्रेसकडेच राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. तर राधानगरी आणि पन्हाळा शाहूवाडी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटासाठी निश्चित झाल्याचे कळते. राधानगरी -आजारा- भुदरगड मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील दावा केला होता. मात्र महाविकास आघाडी मधून ए वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांच्यात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे ही जागा शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

Kolhapur Vidhan Sabha
Prakash Awade : आमदार आवाडेंचा महायुतीवर दुसरा वार, हातकणंगलेतील उमेदवार जाहीर करून वाढवला दबाव

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP) हा कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. मात्र चंदगड विधानसभा मतदारसंघात अद्याप राष्ट्रवादीने कित्ते खोललेले नाहीत. तर शिरोळ आणि इचलकरंजी मतदारसंघावर काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेनेने देखील दावा केला आहे. शिरोळ मध्ये काँग्रेसकडे गणपतराव पाटील हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडे देखील हेच उमेदवार असू शकतात. मात्र या दोन जागेचा अद्याप तोडगा निघालेला नाही.

Kolhapur Vidhan Sabha
Rajendra Raut : जरांगे-पाटलांवर तुटून पडणारे आमदार राजेंद्र राऊत आता करणार ठिय्या आंदोलन, नेमकं कारण काय?

महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटपात कोण उमेदवार असू शकतात.

कोल्हापूर उत्तर- काँग्रेस- मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, आमदार जयश्रीताई जाधव किंवा नव्या कार्यकर्त्याला संधी.

कोल्हापूर दक्षिण -काँग्रेस -ऋतुराज पाटील

करवीर -काँग्रेस- राहुल पाटील

हातकणंगले - काँग्रेस - राजू बाबा आवळे

कागल -राष्ट्रवादी शरद पवार गट - समरजीत सिंह घाटगे

चंदगड- राष्ट्रवादी बाबुळकर नंदाताई बाबुळकर किंवा नव्या कार्यकर्त्याला संधी

राधानगरी - शिवसेना ठाकरे गट- के पी पाटील किंवा ए वाय पाटील

पन्हाळा शाहूवाडी- शिवसेना - माजी आमदार सत्यजित पाटील

शिरोळ- गणपतराव पाटील, व इचलकरंजी अद्याप जागावाटप निश्चित नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com