Maratha Reservation-ST Service
Maratha Reservation-ST Service Sarkarnama

Maratha Reservation ST Services Halted : शिरोळमध्ये बस फोडली; कर्नाटकची महाराष्ट्रात एसटी सेवा बंद

Maratha Reservation Protest : राज्यात मराठा समाजाचा आरक्षणावरून जाळपोळीच्या घटना घडत असताना कोल्हापुरातही याचे पडसाद उमटू लागले आहेत.
Published on

Kolhapur News : राज्यात मराठा समाजाचा आरक्षणावरून जाळपोळीच्या घटना घडत असताना कोल्हापुरातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. कोल्हापुरात राज्य परिवहन महामंडळाच्या 'एसटी'वर दगडफेक करून मोडतोड करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

कुरुंदवाड ते पुणे स्टेशन बस (क्रमांक एम एच 14 बी टी 3782) ही दत्त कारखाना शिरोळ येथे थांबली होती. दरम्यान, तीन-चार अज्ञात व्यक्तींनी येऊन बसवर चारही बाजूने दगडफेक केली. समोरील व मागील दोन्ही बाजूंच्या काचा फोडल्या. अज्ञातांनी एसटीची हेड लाइटही फोडली. सुदैवाने या तोडफोडीत कोणीही प्रवासी जखमी झालेला नाहीत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीत पाहणी केली आहे.

Maratha Reservation-ST Service
Maratha Reservation : पंतप्रधान मोदी विशेष अधिवेशनात आरक्षण का देत नाहीत?

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे लोण आता राज्यभर पसरू लागले आहे. मराठा समाज सकल मराठा समाजाने दसरा चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. याचवेळी, राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्यांतही जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत.

राज्यात कोणतेही आंदोलन झाले की, त्याच्या सर्वाधिक फटका एसटीला बसतो. हे जाणून राज्य परिवहन मार्गानेही खबरदारी घेतली आहे. मराठा आंदोलनात एसटी महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येत आहे.

सोमवारी (ता.३०) कोल्हापूरहून इचलकरंजी आगारातून निघालेली छत्रपती संभाजीनगरला जाणारी एसटी बार्शीतूनच परत आली. त्यामुळे राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहूनच एसटी बंदचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाने दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

दुसरीकडे कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस टार्गेट केल्या जात असल्याने कर्नाटक सरकारने निर्णय घेतला असून, पुढील निर्णय होईपर्यंत बस सेवा बंद राहणार असल्याचे कर्नाटक सरकारने सांगितले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Maratha Reservation-ST Service
Maratha Reservation : मरतोय मराठा, जळतोय मराठा... ; मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com