Kolhapur: कोल्हापूर महापालिकेचा अजब कारभार! घरफाळा घोटाळ्यातील संशयित आरोपीकडेच दिल्या तिजोरीच्या चाव्या

Kolhapur Municipal Corporation, Sanjay Bhosale, Property Tax Scam: घरफाळा घोटाळ्यातील निलंबित संशयित संजय भोसले यांच्याकडे कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेचे वार्षिक बजेट सुमारे ३० कोटी रुपयांचे असून, येथे दररोज लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. अशा महत्त्वाच्या परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेने घेतलेला एक निर्णय सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. घरफाळा घोटाळ्यातील संशयित आरोपी संजय शिवाजीराव भोसले यांच्याकडेच महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. आधीच घोटाळ्याचा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीकडे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असणारे पद सोपवण्याचा निर्णय नेमका कोणाच्या सांगण्यावरून घेतला, असा सवाल आता उपस्थित केला जात असून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित केली जात आहे.

संजय भोसले यांची घरफाळा अपहारप्रकरणी सध्या विभागीय चौकशी सुरू आहे आणि ते महापालिकेतून निलंबित आहेत. वास्तविक पाहता, एखादा अधिकारी निलंबित झाल्यानंतर आणि त्याची चौकशी सुरू असताना, नियमांनुसार त्याच्याकडे आर्थिक व्यवहार नसलेले, अकार्यकारी पदाचे कामकाज सोपवणे बंधनकारक असते. असे असतानाही महापालिका प्रशासनाने या सर्व नियमांना बगल देत, त्यांच्याकडे थेट कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार हाताळणारे परिवहन व्यवस्थापकासारखे महत्त्वाचे पद सोपविल्याने महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Kolhapur Municipal Corporation
Maharashtra News Live Update : वांगचूक यांना पाठिंबा वाढला; उद्या अमित ठाकरे भेटीसाठी जाणार

महापालिकेच्या संगणकीय प्रणालीमध्ये बेकायदेशीररीत्या फेरफार करून घरफाळा विभागात कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका संजय भोसले यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढले होते, ज्यामध्ये महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आला होता. या घोटाळ्यात संजय भोसले यांच्यासह दिवाकर कारंडे, नितीन नंदवाळकर, विजय खातू आणि अनिरुद्ध शेट्ये यांना अटक झाली होती व त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. सद्यस्थितीत यातील अनिरुद्ध शेट्ये यांचे निधन झाले असून, विजय खातू हे सेवानिवृत्त झाले आहेत. तर दिवाकर कारंडे यांना नियमानुसार अकार्यकारी पद असलेले विवाह नोंदणी विभागाचे कामकाज देण्यात आले असून नितीन नंदवाळकर हे विद्युत शाखेत कार्यरत आहेत.

असे असताना दुसरीकडे, कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागात सध्या कोट्यवधी रुपयांतून विविध विकासकामे सुरू आहेत. तसेच तब्बल १०० नवीन ई-बसेस लवकरच केएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, ज्यांची आर्थिक उलाढालही कोट्यवधी रुपयांच्या घरात असणार आहे. याशिवाय, बिंदू चौकासह कोल्हापूर शहरातील अनेक प्रमुख आणि मोक्याच्या ठिकाणी केएमटीचे अधिकृत पार्किंग लॉट्स आहेत, जिथून दररोज परिवहन मंडळाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते.

Kolhapur Municipal Corporation
PMC: पुणे महापालिकेचे बनावट लेटरहेड, IT चे बोगस सर्टिफिकेट; पुण्यात बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक, गृहविभागाची 'सुमोटो' चौकशी

अशा प्रकारे दररोज लाखो रुपयांची कमाई आणि भविष्यातील कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची जबाबदारी असलेल्या परिवहन विभागाचा संपूर्ण कारभार, घरफाळा घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी संजय भोसले यांच्याकडे सोपवण्यात आल्यामुळे महापालिका वर्तुळात आणि कोल्हापूरकरांमध्ये यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com