Kolhapur politics : शड्डू ठोकला, एकमेकांना बघून घेण्याची भाषा; कोल्हापूर महापालिकेत महायुतीचे नगरसेवक एकमेकांना भिडले

Mahayuti corporators clash, Mahayuti Kolhapur : महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर; वृक्ष प्राधिकरण बैठकीत शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक, धमकीच्या भाषेने वातावरण तापले.
Mahayuti corporators clash
Mahayuti corporators clashSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur municipal news : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत पुन्हा एकदा महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सत्तेत एकत्र असूनही शिवसेनेचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद उफाळून आला आहे. एकमेकाला बघून घेण्याची भाषा आणि खाली चौकात चल तुला दाखवतो अशा धमक्या अन् थेट बैठकीत शड्डू ठोकत दोन प्रमुख नेते भिडले आहेत. बैठकीत अचानक हा वाद सुरू झाल्याने काही काळ तणाव बनला होता.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मंगळवारी वृक्ष प्राधिकरण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या शेवटच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आदिल फरास हे वृक्षतोड संदर्भात काही प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी विरोध दर्शवल्याचे सांगण्यात येते.

फरास यांनी ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध होत असल्याचे सांगत यावरून शाब्दिक वाद आणखीन वाढला. यापूर्वीही महानगरपालिकेच्या सभागृहात दोघांचा वाद विकोपाला गेला होता. परिवहन सभापती निवडीनंतर हा वाद आणखीन चिघळला होता. त्यात पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरण बैठकीत हा वाद झाला.

Mahayuti corporators clash
BJP CJP controversy : वारं फिरलंय..? क्रॉक्रोच जनता पार्टी नव्हे 'त्या' 180 संघटनांचा भाजपने घेतलाय धसका

बैठकीतच एकमेकाला बघून घेण्याच्या भाषेसह थेट एकमेकांकडे पाहून शड्डू मारण्यात आला. शिवाय महापालिकेतून खाली चल तुला बघून घेतो, अशा पद्धतीची शब्द एकमेकांकडून आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या गोष्टीची माहिती कार्यकर्त्यांना समजल्यानंतर दोन्ही बाजूचे समर्थकांनी आणि महापालिकेच्या चौकात मोठी गर्दी केली.

Mahayuti corporators clash
BJP News : चेंडू जितका वर जायचा होता तो गेला, आता वेगाने खाली..! भाजपच्या बड्या नेत्याचे बंडाचे संकेत, माजी केंद्रीय मंत्र्यांची पत्नीही आहे आमदार

महापालिकेसमोरील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. दरम्यान या वादावर समेट घडवण्यासाठी इतर नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील नगरसेवकच हमरीतुमरीवर आल्याने कोल्हापूर शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com