Kolhapur Politics : नगरसेवक होणाऱ्या नेत्यांची 'ऑडिओ क्लिप' महापालिकेच्या चौकात वाजणार; शिवसेनेचा नेता वचपा काढण्याच्या तयारीत

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेपूर्वी स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेनेने ऑडिओ वाजवण्याचा इशारा दिल्याने राजकीय वाद चिघळला असून न्यायालयीन तक्रारीमुळे वातावरण तापले आहे.
Kolhapur Municipal Corporation prepares for special meeting as Shiv Sena leader threatens to play audio recording over accepted corporator controversy.
Kolhapur Municipal Corporation prepares for special meeting as Shiv Sena leader threatens to play audio recording over accepted corporator controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुकीनंतर पहिल्यांदाच विशेष सभा होणार आहे. या सभेत स्थायी समिती सभापती परिवहन, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीसाठी सदस्यांची निवड होणार आहे. यानंतर 2015 चा राजकारणातील वचपा काढण्याचा डाव शिवसेनेच्या नेत्यांनी आखला आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून विरोधी गोटातून निवड होणाऱ्या एका पदाधिकाऱ्याच्या विरोधात एक संभाषण रेकॉर्डिंग महापालिकेच्या चौकातच वाजवण्याचे नियोजन केले आहे.

2015 साली झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेवर असताना ताराराणी आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याची स्वीकृत नगरसेवक पदावर निवड झाली होती. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून संबंधित पदाधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वीकृत नगरसेवक होण्यापासून रोखले होते. न्यायालयीन लढाई लढून तब्बल एक वर्ष सभागृहात येण्यासाठीचा कालावधी लागला होता.

आता तोच पदाधिकारी काँग्रेसचा वचपा काढण्याच्या मनस्थितीत आहे. तत्कालीन परिस्थितीत पडद्यामागे राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची यंदा विरोधी आघाडीतून स्वीकृत पदावर निवड केली आहे. त्याला त्या पदाधिकाऱ्याकडून विरोध होणार आहे. संबंधित पदाधिकाऱ्याची एका कंपनीसोबत केलेली डीलची संभाषण रेकॉर्डिंग महानगरपालिकेच्या आवारात वाजवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामध्ये कंपनीसोबत केलेला व्यवहार आणि महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख यामध्ये आहे.

Kolhapur Municipal Corporation prepares for special meeting as Shiv Sena leader threatens to play audio recording over accepted corporator controversy.
Kolhapur News : कोल्हापूर पालिकेत सत्तेसाठी महायुतीची रस्सीखेच; 'महिला राज' आणि 'परिवहन'च्या चाकावरून समीकरण सुटेना

शिवसेनेच्या नगरसेवकच्या विरोधात न्यायालयात धाव

दरम्यान यंदाच्या सभागृहात निवडून गेलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांच्या विरोधात एका व्यक्तीने ३ अपत्य असल्या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. संबंधित नगरसेवकाला ३ अपत्य असल्याचा दाखला या तक्रारदाराकडून अर्जाद्वारेे करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com