

Buildings Divided for Ward Demarcation: Controversy Explained : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रभाग रचने संदर्भातील तत्वांची पायमल्ली करत कोल्हापूर महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 16 मध्ये इमारतीमध्ये दोन भाग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात महानगरपालिकेकडे हरकती द्वारे न्याय मागितला असता पालिकेकडून त्याला समानधारक उत्तर दिलेले नाही.
तक्रारदार अमोल देशिंगकर यांनी यासंदर्भात न्याय मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महापालिकेने केलेल्या प्रभाग रचनेत एका इमारती विभागणी केली असल्याचा आरोप देशिंगकर यांच्याकडून करण्यात आला आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेली प्रारूप रचना १० ऑक्टोबर २०२५ अंतिम केली आहे.
प्रभाग रचना करताना प्रशासनाकडून शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आली आहे. त्या विरोधात अमोल राजाराम देशिंगकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये प्रारूप व अंतिम प्रभाग रचनेविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात येणाऱ्या 18 नोव्हेंबर रोजी मुंबईत सुनावणी होणार असल्याची माहिती अमोल देशिंगकर यांनी दिले.
नियम काय सांगतो?
नगरविकास विभागाने काढलेल्या शासन आदेशात प्रभाग रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये याचं उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नाले, डोंगर रस्ते, रेल्वे रूळ, फ्लाय ओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन प्रभाग रचना निश्चित करण्यात यावी.
कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश नगर विकास विभागाच्या वतीने प्रारूप प्रभाग अंतिम करताना देण्यात आले आहेत. दरम्यान, यासंदर्भात महानगरपालिकेचे अधिकारी उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता, 2011 च्या प्रभाग रचना आणि प्रगनकानुसार ही प्रभाग रचना केलेली आहे. निवडणूक आयोगाची मान्यता देखील आलेली आहे, असे अडसूळ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.