Kolhapur Mahapalika : कोल्हापुरात महायुती टेन्शनमध्ये : एका प्रभागात अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करावे लागण्याची शक्यता

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीला पहिल्याच टप्प्यात धक्का बसला असून, प्रभाग 12 मध्ये उमेदवार नसल्याने अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्याची वेळ आली आहे.
Mahayuti leaders during Kolhapur municipal election turmoil as alliance struggles with candidate coordination, leading to support for an independent candidate in Ward 12.
Mahayuti leaders during Kolhapur municipal election turmoil as alliance struggles with candidate coordination, leading to support for an independent candidate in Ward 12.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीवर एका प्रभागात अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करावे लागण्याची शक्यता आहे. उमेदवारांमध्ये समन्वय नसल्याने आणि गैरसमजुतीमुळे प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महायुतीचा उमेदवारच नाही. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता असणाऱ्या उमेदवाराला पुरस्कृत करून त्याला महाविकास आघाडीविरोधात मैदानात उतरवावे लागू शकते.

महायुतीकडून उमेदवार घोषणा करण्यास विलंब झाला. शेवटच्या क्षणापर्यंत ताणले गेलेल्या या प्रकारामुळे उमेदवारच संभ्रमावस्थेत सापडले होते. त्यातच प्रभाग क्रमांक 12 ब मधून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये माजी महापौर हसीना फरास यांनी राष्ट्रवादीकडून तर संगीता पोवार यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. संगीता पोवार यांनी क मधून देखील अर्ज दाखल केला होता. मात्र छाननी झाल्यानंतर क मधून पोवार यांनी अर्ज माघार घेतला. त्यामुळे क मध्ये महायुतीचा उमेदवार राहिला नाही.

वस्तुस्थिती पाहता महायुतीच्या उमेदवार यादीमध्ये प्रभाग क्रमांक 12 अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्गातून अश्किन आजरेकर, सर्वसाधारण ब मधून संगीता पवार, सर्वसाधारण महिला क मधून हसीना फरास, आणि ड मधून आदिल फरास यांची उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र प्रभाग क्रमांक ब मधून हसीना फरास यांनी देखील अर्ज भरल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ उडाली होती.

Mahayuti leaders during Kolhapur municipal election turmoil as alliance struggles with candidate coordination, leading to support for an independent candidate in Ward 12.
Kolhapur Shivsena : शिवसैनिकांचा संयम संपला,नेत्यांचं टेन्शन वाढलं, काल झालेली आघाडी तुटण्याची शक्यता

काल रात्री उशिरापर्यंत महायुतीमधील खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर दोघांपैकी एका उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज सकाळपासून संगीता पोवार या संपर्क क्षेत्राबाहेर राहिल्या. त्यामुळे प्रभाग बारा ब मधून हसीना फरास यांनी माघार घेतली.

Mahayuti leaders during Kolhapur municipal election turmoil as alliance struggles with candidate coordination, leading to support for an independent candidate in Ward 12.
Kolhapur News : सतेज पाटील जे काही बोलतील त्याला प्रत्युत्तर मिळेलच; खासदार महाडिकांनी दिला इशारा

दरम्यान आदिल फरास यांनी महायुती मधून घरातूनच 2 उमेदवारांची घोषणा केल्याने हालचालीने वेग घेतला होता. त्यामुळे हसीना फरास यांनी माघार घेतल्याची चर्चा केंद्रावर होते. पण याचा फटका आता थेट महायुतीला बसणार असून प्रभाग 12 क मध्ये महायुतीचा उमेदवारच राहिलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com