Kolhapur Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात हळूहळू विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तंग होऊ लागले आहे. महायुतीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार याबाबत चर्चा घडत असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी बोलताना, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप दावा करणार आहे. राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिले त्यामुळे त्यांचा दावा साहजिक असेल. पण पोट निवडणुकीमध्ये भाजपने खूप मते घेतली आहेत. भाजपकडून महेश जाधव, राहुल चिकोडे, नाना कदम यांच्याबरोबर कृष्णराज महाडिक (krishnaraj Mahadik) देखील कोल्हापूर उत्तर मधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे (vidhanSabha) आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा दिला होता. तर भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी 80 हजार इतकी मते मिळवली. याचाच आधार घेत या विधानसभा निवडणुकीत भाजप या मतदारसंघावर दावा करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.