Kolhapur News : चंदगडमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांनी पोखरले; अपक्षांचा झेंडा फडकणार?

Mahayuti-Mahavikas Aghadi News : मतदारसंघात अपक्षांचा झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी हेच अपक्ष या दोन्ही आघाडीच्या उमेदवारांचे पराभवाचे कारण ठरू शकतात हे नक्की.
Mahayuti-Mahavikas Aghadi News
Mahayuti-Mahavikas Aghadi Newssarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : चंदगड विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल 17 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीमधून झालेली बंडखोरी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत असलेली नाराजी आणि त्यातून बंडखोरी करत महाविकास आघाडीचे दोन मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आतापासूनच धोक्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून अपक्षांचा झेंडा फडकणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी हेच अपक्ष या दोन्ही आघाडीच्या उमेदवारांचे पराभवाचे कारण ठरू शकतात हे नक्की.

चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांनी डोकेदुखी वाढवली आहे. तब्बल 17 उमेदवार रिंगणात असल्याने त्यांचा धोका महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे. या 17 मधील पाच अपक्ष उमेदवार सक्षम आणि गट तटात असल्याने त्यांचे पारडे जड आहे. शिवाय महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांच्याबाबत मतदारसंघात असलेली नाराजी ही आपल्या बाजूने झुकवण्यासाठी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार पाटील यांचे चंदगड व आजरा विभागात पूर्वीपासून त्यांचे गट आहेत. आमदारकीच्या पाच वर्षांच्या कालावधीत गडहिंग्लज विभागात त्यांनी चांगला जम बसवला आहे. तिथेही स्वतंत्र गट केला आहे.

Mahayuti-Mahavikas Aghadi News
Amit Shah: महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? शाहांनी पहिल्याच प्रचारसभेत दिले मोठे संकेत

महाविकास आघाडीकडून (MVA) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतूनच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातून विरोध आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न बाभुळकर यांच्याकडून करण्यात आला. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे आप्पी पाटील यांनी चंदगडमधून अपक्ष अर्ज करत महाविकास आघाडी मधून बंड केले आहे. महाविकास आघाडीतील बंडखोर नेत्यांनी ठरवल्यानुसार आपल्यापैकी एक उमेदवार निश्चित करून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांना चाल दिली आहे.

Mahayuti-Mahavikas Aghadi News
Jayshree Patil : काँग्रेसकडून निलंबनाच्या कारवाईनंतर जयश्रीताई पाटील म्हणाल्या, ‘वसंतदादा घराण्यावर अन्याय...’

महायुतीमध्ये भाजपचे (BJP) चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी ठेवली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या नंबरची मते घेऊन यावेळचा प्रमुख दावेदार म्हणून पाटील यांनी ओळख केली होती. मात्र महायुतीमुळे उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याने बंडाचा झेंडा हातात घेतला आहे. चंदगड मधील नागरिकांच्या सातत्याने संपर्कात राहून यावेळी त्यांनी आपली बाजू भक्कम केली आहे. त्याचाच लाभ त्यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. शिवाय महायुतीमध्ये (Mahayuti) पडलेली फुट आणि भाजपच्या अंतर्गत गोट्यातून होणारी मदत शिवाजीराव पाटील यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भाजपनेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महायुती मधून जाहीर केलेली उमेदवारी.

Mahayuti-Mahavikas Aghadi News
Ambadas Danve: तानाजीराव, किती प्रॉम्पटिंग करायचं! अरे, मुख्यमंत्र्यांना काही तरी बोलू द्या! VIDEO पाहा

शिवाय जनसुराज्य शक्तीने देखील या ठिकाणी उमेदवार दिल्याने महायुतीला फाटे फुटले आहे. त्याचा फायदा शिवाजी पाटील यांनाच होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून देखील स्वाकियांनी बंडाचे निशाण फडकवल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याचा अंदाज आहे.

लोकसभा निवडणुकीत आप्पी पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. काँग्रेस नेते चेन्नीथला यांनी राज्यात कुठेच मैत्रीपूर्ण लढत नाही, असा दावा केला आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. सांगलीत देखील काँग्रेसच्या नेत्या सुमनताई पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे आप्पी पाटील यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करण्यात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com