Amit Shah: महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? शाहांनी पहिल्याच प्रचारसभेत दिले मोठे संकेत

Mahayuti CM News : राज्यात पुन्हा एकदा जर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 'टफफाईट' पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडी अशा दोन्ही बाजूने महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा ठोकला जात आहे. त्यात महाविकास आघाडीप्रमाणेच आता महायुतीतहू मुख्यमंत्रिपदावरुन सुप्त संघर्ष सुरू असल्याचं लपून राहिलेलं नाही.

भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभांना सुरुवात केली आहे. आपल्याच पहिल्याच सभेत शहांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत तेच महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री असतील याबाबत सूचक विधान केलं आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत महायुतीच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Barshi Constituency : माझ्यामुळे तुझी प्रॉपर्टी राहिलीय, नायतर सावंतांकडे गहाण पडली असती; राजेंद्र राऊतांचा ओमराजेंवर पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, येत्या वीस तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे.त्यात महाराष्ट्रातल्या जनतेला निर्णायक भूमिका घ्यायची आहे.दोन महिन्यांपूर्वी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. विदर्भ, कोकण, मुंबई, जळगाव अशा ज्या ज्या ठिकाणी गेलो, तिथे लोकांची एकच इच्छा आहे,ती म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणायचं आणि फडणवीसांना विजयी करायचं, असंही अमित शाहांनी सांगितलं. शाहांचं हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे महायुती सरकारच्या मुख्यमंत्रि‍पदी शिंदे, अजितदादा नाहीतर फडणवीसांनाच बसवणार असल्याचे तर संकेत नाही ना असे बोलले जात आहे.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Poonam Mahajan : गोपीनाथ मुंडे यांच्या घात की अपघात?, पूनम महाजन यांचं मोठं विधान, म्हणाल्या, '...षडयंत्र'

महाराष्ट्रात महायुतीचं (Mahayuti) सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्राचा वापर करत देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले होते.त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांचे नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी चर्चेत आणले जात आहे.

राज्यात पुन्हा एकदा जर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.यातच एकनाथ शिंदे यांना सीएम होणार की फडणवीसांना पुन्हा संधी मिळणार वा अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्नं भाजप पूर्ण करणार याविषयी तर्क-वितर्कांना मोठं उधाण आलं आहे. पण याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या पुढच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत मोठे संकेत दिले आहेत.

Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Nagpur East Assembly: पूर्व नागपूरमध्ये बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसची अन् टेन्शन भाजपला

अमित शाह यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आम्ही महायुती म्हणून याबाबत एकत्रित बसून आम्ही निर्णय घेऊ.तसेच मुख्यमंत्रिपदाबाबत बोलण्याचा त्यांना तो अधिकार आहे‌, असेही अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com