Jayshree Patil : काँग्रेसकडून निलंबनाच्या कारवाईनंतर जयश्रीताई पाटील म्हणाल्या, ‘वसंतदादा घराण्यावर अन्याय...’

Assembly Election 2024 : काँग्रेस पक्षाने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी वसंतदादा पाटील घराणे हे कायम काँग्रेससोबत राहिले आहे.
Jayshree Patil
Jayshree Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 08 November : सांगली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही कारवाई केली आहे.

सांगली मतदारसंघातून काँग्रेसकडून जयश्रीताई पाटील (Jayshreetai Patil) ह्या विधानसभेसाठी इच्छुक होत्या. मात्र, काँग्रेसने मागील निवडणुकीत सांगलीतून निवडणूक लढवलेले शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनाच पुन्हा संधी दिली आहे, त्यामुळे जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे जयश्री पाटील यांना खासदार विशाल पाटील यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेसच्या (Congress) अधिकृत उमेदवाराच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवक, पदाधिकारी आणि पाटील समर्थक कार्यकर्त्यांनाही पक्षाकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे ‘सांगली पॅटर्न’ जिल्ह्यात काँग्रेस पक्षावरच उलटण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

Jayshree Patil
Barshi Constituency : माझ्यामुळे तुझी प्रॉपर्टी राहिलीय, नायतर सावंतांकडे गहाण पडली असती; राजेंद्र राऊतांचा ओमराजेंवर पलटवार

काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यावर जयश्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी वसंतदादा पाटील घराणे हे कायम काँग्रेससोबत राहिले आहे, त्यामुळे माझी उमेदवारी ही महाविकास आघाडीचीच उमेदवारी आहे, असे जयश्री पाटील यांनी सांगितले.

Jayshree Patil
Shinde Vs Thackeray : महाआघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

जयश्री पाटील म्हणाल्या, सांगली विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी डावलण्यात आल्याने माझ्यावर अन्याय झाला आहे. वसंतदादा घराण्यावर झालेला अन्याय दूर करण्याच्या उद्देशाने मी सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, त्यामुळे पक्षाने आमच्यावर कारवाई केली असली तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत कायम आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com