Mumbai News: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आज आझाद मैदानावर तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे राज्य असलेले सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार की नाहीत, याबाबतचा सस्पेन अद्याप कायम आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेवरुन डिवचलं आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जाते. त्यावरुन 'पोलीस कमिशनरचा फौजदार झाला पार्ट 2' अशा शब्दात राऊतांनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावत 'एका दगडात दोन पक्षी मारले' आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत मात्र, एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत अनिश्चितता आहे.
त्याबाबत राऊतांना विचारले असता "सत्तेशिवाय काही जण राहू शकत नाहीत. शपथ टाळण्यासाठी शिंदे यांच्याकडे हिमंत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्याविषयी राऊत म्हणाले की अजितदादांना दिल्लीकडून काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. अजित पवारांनी दिल्लीशी जळवून घेतले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राजशिष्टाचारानूसार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनाही आजच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, ही नेतेमंडळी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? हे सांयकाळी समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.