Maharashtra CM Oath Ceremony: फडणवीसांची भगवी निमंत्रण पत्रिका अन् अजितदादांचा गुलाबी टी शर्ट; सोशल मीडियावर रंगली चर्चा!

Devendra Fadnavis & Ajit Pawar Oath Taking Ceremony : महायुतीच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी परिधान करीत असलेल्या टी शर्टवर अजित पवारांच्या फोटोसह 'एकच वादा अजितदादा'अशी टॅग लाईन आहे.
Oath Ceremony invitation card
Oath Ceremony invitation cardSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा आज आझाद मैदानावर सांयकाळी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची तयारी पू्र्ण झाली आहे. भाजपने यासाठी खास निमंत्रण पत्रिका छापली असून निमंत्रण पत्रिकेत भगव्या रंगाच्या वापर सर्वाधिक करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबी रंगाचे टी शर्ट देण्यात आले आहेत.

फडणवीसांची भगवी पत्रिका अन् अजितदादांचा गुलाबी टी शर्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. नेटकऱ्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीत यावरुन चढाओढ पाहायला मिळत आहे.महायुतीच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी परिधान करीत असलेल्या टी शर्टवर अजित पवारांच्या फोटोसह 'एकच वादा अजितदादा'अशी टॅग लाईन आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना भाजपकडून निमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेवर ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. पण आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असल्याने अन्य कोण आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, याबाबत उत्सुकता लागली आहे.

Oath Ceremony invitation card
Sanjay Raut : 'पोलीस कमिशनरचा फौजदार झाला- पार्ट 2'; राऊतांनी एका दगडात मारले दोन पक्षी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत संध्याकाळी 5.30 वाजता हा शाही शपथविधी सोहळा होणार आहे.यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत अनिश्चितता आहे. त्यानंतर कॅबिनेटची बैठक होणार असून त्यामध्ये विधानसभा अध्यक्षपदासंबधी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपची भगवी निमंत्रण पत्रिका अन् राष्ट्रवादीच्या गुलाबी टी शर्टची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी विशेष फेटे तयार करण्यात आले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी हे फेटे पुण्याहून मुंबईला रवाना करण्यात आले आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी हे फेटे तयार केले आहे. अजितदादांसाठी 'गुलाबी' तर मुख्यमंत्र्यांसाठी विशेष पगडी तयार करण्यात आली आहे.

Oath Ceremony invitation card
Kolhapur Politics: देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' बंद लिफाफ्यात कुणाचं नाव? महाडिक की कोरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com