Kolhapur Politics : ज्यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री, त्यांच्याच लेकीसाठी आता सतेज पाटील राबणार

Kolhapur North Assembly Election Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार बदलन्यात आला आहे. राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील उद्रेक पाहून उमेदवार बदलाचा निर्णय काँग्रेस नेते सतेज पाटील यांना घ्यावा लागला.
Satej Patil, Digvijay Khanvilkar, Madhurimaraje Chhatrapati
Satej Patil, Digvijay Khanvilkar, Madhurimaraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhpaur News, 29 Oct : राजकारणात मैत्री आणि शत्रुत्व कायमचं नसतं, असं म्हटलं जातं. काळानुसार राजकारणात भूमिका बदलली जाते. त्याचा प्रत्यय कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील (Kolhapur North Assembly Constituency) महाविकास आघाडीकडून काँग्रेसचा उमेदवार बदल्यानंतर आला आहे.

राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील उद्रेक पाहून उमेदवार बदलाचा निर्णय काँग्रेस नेते सतेज पाटील यांना घ्यावा लागला. त्यानंतर काँग्रेसकडून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) म्हणजे माजी आरोग्य राज्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या. याच दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विधानसभेत एन्ट्री केली होती. आता त्यांच्याच लेकीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वेळ पाटलांवर आली आहे.

Satej Patil, Digvijay Khanvilkar, Madhurimaraje Chhatrapati
Maharashtra Vidhan Sabha Election Live Update : महायुती 'Action Mode' मध्ये; बंडोबांचं बंड थोपवणार..?

2004 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन करवीर विधानसभा मतदारसंघ दोन प्रमुख लढतीमुळे गाजला होता. जिल्ह्याचे नेते म्हणून ओळख असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून आत्ताचे काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील हे माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले होते.

दिग्विजय खानविलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर तर सतेज पाटील (Satej Patil) यांनी अपक्ष म्हणून विमान या चिन्हावर निवडणूक लढवली होती. सतेज पाटील यांना सध्याचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा छुपा पाठिंबा होता. दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करून सतेज पाटलांनी विधानसभेत पहिल्यांदाच एन्ट्री केली.

Satej Patil, Digvijay Khanvilkar, Madhurimaraje Chhatrapati
Suresh Dhas: फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला टाळून शिलेदार धसांना उमेदवारी दिली; आष्टीत आता महायुतीत बंडखोरीचा पेच

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेले खानविलकर यांना 74 हजार 305 मते तर अपक्ष म्हणून लढलेले सतेज पाटील यांना 1 लाख 16 हजार 909 इतकी मते पडली होती. पाटील यांना जवळपास 42 हजार 604 इतके मताधिक्य होते. खानविलकर यांचा पराभव केल्याने सतेज पाटील यांचे महत्त्व वाढले होते.

त्यामुळे पुढील राजकारणात सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुकीत स्वतःचा गट स्थापन करत अस्तित्व निर्माण केले. दिग्विजय खानविलकर यांची कन्या मधुरीमाराजे छत्रपती यांचा विवाह युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्याशी झाला.

खानविलकर यांचा पराभव केल्यानंतर आता त्यांच्याच लेकीच्या विजयासाठी सतेज पाटलांना मैदानात उतरावे लागणार आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना सतेज पाटील यांना काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मधुरीमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवर माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या निवडणुकीची आठवण यानिमित्ताने झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com