Kolhapur Politics : कोल्हापुरात पुन्हा मोठे राजकीय धमाके? काठावरचे नेतेमंडळी पटापट महायुतीत उड्या मारणार

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : देशात भाजप आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याकडे महायुतीमधीलच पक्षाची उमेदवारी असावी, अशी इच्छा आहे.
Kolhapur
KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा आणि विधानसभेच्या 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवीन समीकरणं उदयाला आली आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी विजय मिळवला. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) भोपळाही फोडू दिला नाही. सर्वच जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

तर राज्यात एकमताने महायुती (Mahayuti) सरकार स्थापन झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने येत्या नव्या वर्षात पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय धमाके होणे शक्य आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांची पावले महायुती तिकडे वळत आहेत. सध्या यांनी कुणाची जरी भेट घेतली नसली तरी सध्याची भूमिका तळ्यात मळ्यात आहे. वेळ आणि काळ पाहूनच हे इच्छुक महायुतीत उड्या मारणार असल्याचे चित्र आहे.

देशात भाजप आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याकडे महायुतीमधीलच पक्षाची उमेदवारी असावी, अशी इच्छा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आपापल्या मतदारसंघात विकास कामांना गती येईल. या मानसिकतेत अनेक जण आहेत.

Kolhapur
Dhananjay Munde : 'धनंजय मुंडेंबाबत पक्ष जी काही भूमिका घेईल ती आम्हाला...',NCP च्या 'या' नेत्याचे मोठे संकेत

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जन महायुतीच्या सीमेवर आहेत. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या दोन आंदोलनामध्ये काही नगरसेवक जाणूनबुजून यापासून लांब राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे नेत्यांच्या मनात ही शंकेची पाल चूकचूकली आहे.

येत्या नवीन वर्षात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत या निवडणुकीची घोषणा शक्य आहे. त्यामुळे वेळ काळ आणि आपल्या उमेदवारीचं बेत पक्का करून काहीजण महायुतीतील तीन पक्षात जाण्याचा बेत करत आहेत.

Kolhapur
Chetan Tupe : मोठी राजकीय घडामोड! अजितदादांच्या आमदारानं घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, ..तर दोन्ही पवार एकत्र येतील!

भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यामधील एका पक्षात जाऊन मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. अनेक जण नव्या प्रभाग रचनेनुसार महायुतीच्या इच्छुक उमेदवारंसोबत तयारीला लागले आहेत. या इच्छुकांचा ओढा सर्वाधिक शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्याचेही सांगितले जाते. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात राजकीय धमाके पाहायला मिळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com