Kolhapur Politics : महाराजांची माफी मागा; कोल्हापूरकर सहन करणार नाही; मंडलिकांच्या वक्तव्याचा सतेज पाटलांकडून समाचार...

Satej Patil On Sanjay Mandlik : अशा प्रकारचं विधान कोल्हापूरकरांना पटलेलं नाही. आम्ही कोल्हापूरकर म्हणून हे कदापि सहन करणार नाही, असे सतेज पाटील म्हणाले.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीकडचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती हे यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. आत्ताचे महाराज (शाहू महाराज छत्रपती) हे कोल्हापूरचे आहेत का? आताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असे विधान मंडलिकांनी केले आहे. हे वृत्त सर्वप्रथम 'साम' वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते. मंडलिकांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics
Kolhapur Lok Sabha Constituency : शाहू महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत; मंडलिकांच्या विधानाने खळबळ

सतेज पाटील म्हणाले, "कोल्हापुरातील जनता असे खालच्या पातळीवरील भाष्य कधीही सहन करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केली आहे. या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी भाजपचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ सगळ्यांनी सांगितलं होतं की, कुणीही वैयक्तिक टीका शाहू महाराजांवर करायची नाही. अशी भूमिका घेऊनसुद्धा संजय मंडलिक यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अशा प्रकारचे अशोभनीय वक्तव्ये करत आहेत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत. याचा निषेध आम्ही करतो. याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील. त्यांनी त्वरीत माफी मागावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. निवडणूक त्यांच्या हातातून निसटून गेली. म्हणून निवडणुकीला वेगळ्या दिशेला घेऊन जायाच त्यांचा प्रयत्न आहे, यात ते यशस्वी होणार नाहीत. अशा प्रकारचं विधान कोल्हापूरकरांना पटलेलं नाही. आम्ही कोल्हापूरकर म्हणून हे कदापि सहन करणार नाही, असे सतेज पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते संजय मंडलिक?

शिवसेना (Shivsena) (शिंदे गट) खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांची कोल्हापुरातील चंदगड तालुका येथील नेसरी या ठिकाणी प्रचारसभा पार पडली. या सभेत भाषण करत असताना यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला होता. यामुळे आता वाद पेटण्याची शक्यता आहे.

मंडलिक म्हणाले, "या मल्लाला हात लावायचा नाही. मल्लाला टांग मारायचं नाही मग ती कुस्ती कशी करायची? जरा काही झालं की, गादीचा अपमान झाला, असा कांगावा केला जातो. पण आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तक म्हणून आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच कोल्हापूरची खरी वारसदार," असे मंडलिक म्हणाले होते.

Kolhapur Politics
Lok Sabha Election 2024 : दोन खासदार-सहा आमदार निवडून दिलेल्या ठाकरेंचा कोल्हापूर बुरुज ढासळतोय? शिंदेंची मदार मात्र भाजपवर...

"खरंतर माझ्या वडिलांनी म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांनी या कोल्हापुरात पुरोगामी विचार जपला. ही राजर्षी शाहू महाराज यांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांनीच आपल्याला पुरोगामी विचार दिला. त्यांनी समतेचा विचार सांगितला. कोल्हापुरात राहणारा प्रत्येक माणूस शाहू विचार घेऊनच जगतो," असेही मंडलिक (Sanjay Mandlik) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com