Lok Sabha Election 2024 : दोन खासदार-सहा आमदार निवडून दिलेल्या ठाकरेंचा कोल्हापूर बुरुज ढासळतोय? शिंदेंची मदार मात्र भाजपवर...

Kolhapur Political News : शिवसेना एक राहिलेली नाही. त्यामुळे उमेदवाराच्या विजयाबाबत संभ्रमावस्था असल्याची चर्चा वाढली.
Lok Sabha Election 2024 :
Lok Sabha Election 2024 :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गल्लोगल्ली कार्यकर्ते आणि वाघाचे चिन्ह असलेल्या शिवसेनेच्या शाखा ही शिवसेनेची कोल्हापुरातील ताकद आहे. आंदोलनाची धार काय असते? याचे जिवंत उदाहरण दाखविणारा शिवसेनेचा कार्यकर्ता, नेते आणि आमदार-खासदार आता दुभंगले आहेत. सर्वांनीच जनतेसाठी म्हणून आपला सवता सुभा मांडला. त्याला कोणी ‘गद्दार’ म्हणाले, तर कोणी ‘बंड’ म्हणाले. या सर्वांमुळे मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुभंगलेली शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद तुलनेने कमी झाली. एकंदरीतच शिवसेनेचा बुरुज ढासळला. (Lok Sabha Election 2024)

ऐतिहासिक बिंदू चौकात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण असले की, दुकानाला कुलूप लावून, प्रसंगी परगावी नोकरीवर असले तरी दांडी मारून हजेरी लावणाऱ्यांनी शिवसेनेवर जिवापाड प्रेम केले. याच शिवसेनेने शहरात आमदार दिले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाणाचे वर्चस्व दाखवून दिले. त्याच बाळासाहेबांनी जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार पाहिजे हे स्‍वप्न पाहिले. उशीर झाला; पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर का होईना, जिल्ह्याला शिवसेनेचे धनुष्यबाणावर विजयी झालेले दोन खासदार मिळाले. जिल्ह्यात दहापैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. ही शिवसेनेची वाढलेली ताकद. मात्र, मुंबईत शिवसेना दुभंगली.

Lok Sabha Election 2024 :
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा मांडत थेट भाजपशी नाळ जुळवली आणि ते मुख्यमंत्री झाले. मुंबई-ठाण्यातील या भूकंपाचे धक्के थेट राधानगरीच्या तटापर्यंत पोहोचले. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटाशी जुळवून घेतले.

याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ‘गद्दारा’ची उपमा देत ‘गेले तर कावळे राहिले ते मावळे’ म्हणून शड्डू ठोकला. ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह गमावले. तरीही आता हातात ‘मशाल’ घेऊन ती पेटविण्याचा, त्याची धग जिल्ह्यातील वाड्यावस्तीपर्यंत पुन्हा पोचविण्याचा प्रयत्न ठाकरे बाप-लेक करीत आहेत. स्थानिक उपनेते स्थानिक जिल्हाप्रमुख संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणेंची त्यांना साथ आहे.

Lok Sabha Election 2024 :
Kolhapur NCP : 'बडा घर, पोकळ वासा!'; कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या स्थितीला जबाबदार कोण?

मुख्यमंत्री शिंदे यांनी खुद्द कोल्हापुरातील शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेऊन येथील नेत्यांना, कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यात महिन्यातून दोन दौरे झाले. सहा आमदारांची आणि दोन खासदारांची ताकद त्यांना पुन्हा उभा करायची आहे. सध्या विद्यमान खासदारांना लोकसभेची उमेदवारी मिळवताना दमछाक करावी लागत आहे. कार्यकर्ते दुभंगले आहेत. शिवसेना एक राहिलेली नाही. त्यामुळे उमेदवाराच्या विजयाबाबत संभ्रमावस्था असल्याची चर्चा वाढली. उमेदवारी घोषित करण्यासाठी होणारा वेळ हे त्याला खतपाणी घालत आहे.

विविध गटांत विभागलेली ताकद -

शिवसेनेकडील (Shiv Sena) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे कुटुंबीय गेली चाळीस वर्षे राजकारणात आहेत. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी याच मतदारसंघात अपक्ष रिंगणात उतरून एकेकाळी इतिहास घडविला. आजही शहरात काही प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये मंडलिकांचा दबदबा आहे. या व्यतिरिक्त भाजपचे नेते-कार्यकर्ते, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंडलिकांचे मेहुणे असलेले आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याच बरोबर खुद्द मंडलिक गट म्हणून त्यांची ताकद आहे. त्याचाही उपयोग या लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो.

असे आहे हातकणंगलेतील चित्र -

हातकणंगले लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने आहेत. त्यांनी शिंदे गटासोबत जाणे पसंत केले असले तरीही त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे तीन माजी आमदार आहेत. डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर यांची ताकद वेगळी आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तर शिंदे गटातील माने यांच्याकडे माने गट म्हणून स्वतंत्र आहे. पिढ्यान्‌पिढ्या ते राजकारणात आहेत. आजपर्यंत पक्ष बदलले असले, तरीही त्यांना मानणारा एक वर्ग आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com