Kolhapur Politics : आधी लगीन 'बिद्री'चं, त्यानंतरच विधानसभा ; ए. वाय. पाटलांचं 'गणित' ठरलं!

Kolhapur Political News : कोल्हापूरचे दोन पाटील राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले..
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Latest News : राधानगरी विधानसभा मतदार संघात आतापासूनच विधानसभेच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यातील संघर्ष वाढलेला दिसतोय. बिद्री कारखान्याच्या निमित्ताने एकेकाळचे सहकारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यात ए. वाय. पाटील यांनी गोपनीय बैठक घेत कार्यकर्त्यांची समजूत काढली असल्याचे समजते. (Latest Marathi News)

Kolhapur Politics
Thane NCP : शरद पवार गटाकडून तरुणांची फळी उभारण्याचा प्रयत्न; ठाणे राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर

या गोपनीय बैठकीत ए. वाय. पाटील यांनी, आजपर्यंत आपण अन्यायचं सहन केला असून, बिद्री साखर कारखाना निवडणुकीचा निर्णय सर्वस्वी राधानगरी भूदरगड मधील माझे कार्यकर्ते घेतील. पण आधी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमनपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यानंतर विधानसभेचे बघू ,अशी स्पष्ट भूमिका जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए.वाय पाटील यांनी मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंबवणे-गारगोटी येथे भुदरगड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रोहीत घरपणकर यांच्या घरी गोपनीय बैठक झाली. यावेळी मुंबईहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर प्रथमच पाटील तालुक्यात आले होते. यावेळी विविध गावांतील सरपंच,माजी सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ए.वाय पाटील यांनी मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील सविस्तर वृत्तांत सांगितला.यावेळी बोलताना ए.वाय.पाटील म्हणाले की, "सातत्याने मला प्रत्येक वेळी शब्द देण्यात आले. मात्र त्याची पूर्तता कधीच करण्यात आली नाही. आता माझ्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे, त्यांना माझ्याकडून निर्णय अपेक्षित आहे. मला विरोधी गटाकडूनही चेअरमनपदाची ऑफर असून ज्या बाजूने कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, अशीच भूमिका आपल्याला घ्यावयाची असून, कार्यकर्त्यांची भूमिका हीच आपली भूमिका राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Kolhapur Politics
Kolhapur Politics : 'बिद्री-भोगावती'चे बिगुल वाजणार? आजी-माजी आमदारांची लिटमस टेस्ट

पडळी (ता. राधानगरी) येथे भुदरगड तालुक्यातील दिडशे कार्यकर्त्यांची बैठक आठवडाभरापूर्वी झाली आहे. त्याच अनुषंगाने आज आंबवणेमध्ये बैठक घेण्यात आली. त्याला भुदरगडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली परखड भूमिका सांगितली असून, माझे कार्यकर्ते ऐकण्याची मनस्थितीत नसून, त्यांची भूमिका हीच माझी अंतिम भूमिका असल्याचे ए.वाय पाटील यांनी सांगितले.

Kolhapur Politics
Gadkari On Shiv Sena-BJP alliance : शिवसेना-भाजप युतीबद्दल गडकरी म्हणाले, जे जे होईल ते ते पाहवे!

पालकमंत्री मुश्रीफ यांचा मेळावा

बिद्री साखर कारखाना निवडणूक संदर्भात मुरगुड येथे पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दि.२१ रोजी भव्य मेळावा होणार आहे. दोघेही राष्ट्रवादीचे असून, या मेळाव्याला असून जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील उपस्थित रहाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

25 ऑक्टोबरला ए. वाय. पाटील यांचा मेळावा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा मेळाव्या झाल्यानंतर 25 ऑक्टोबरला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बिद्री कारखान्यात या संदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात आपण कोणती भूमिका घेणार हे जाहीर करणार असल्याचे ए.वाय. पाटील यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.