Kolhapur Politics: सतेज पाटलांविरोधात चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर! डी. वाय. पाटील विद्यापीठाचा मूळ सातबारा काढणार...

Chandrakant Patil Vs Satej Patil: कोल्हापूरच्या राजकारणात चंद्रकांत पाटील विरुद्ध सतेज पाटील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कसबा बावडा आणि आकुर्डी येथील जमिनींचे मूळ सातबारा तपासण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
Chandrakant Patil Vs Satej Patil
Chandrakant Patil Vs Satej PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 
  • चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांवर निशाणा; डी. वाय. पाटील विद्यापीठावरून सवाल.

  • कसबा बावडा आणि आकुर्डीतील विद्यापीठाच्या जमिनींचे मूळ सातबारा तपासण्याची मागणी.

  • गोकुळ निवडणुकीतील वादानंतर दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत.

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून ते अध्यक्ष निवडीपर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकमेकांना विधानसभा निवडणुकीत विरोधात लढण्याची भाषा यापासून ते, साम्राज्य उध्वस्त करण्याची भाषणे या निवडणुकीच्या निमित्ताने झाले. मात्र पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या डॉ.डी.वाय पाटील विद्यापीठावरून निशाना साधला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्या विरोधात उद्धट आणि वाईट बोललेले अजिबात खपवून घेणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात पाठीवर पाडून त्यांच्या छाताडावर बसवलेले दाखवण्याचे जे प्रकार केले ते आपण सहन करणार नाही, अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघर्ष मोर्चावर टीका करत सतेज पाटील यांना सुनावले आहे.

Chandrakant Patil Vs Satej Patil
Shikshan Sevak Salary: शिक्षणसेवकांच्या मानधनात 20 हजारांची वाढ होणार? शिक्षण संचालकांचा सरकारकडे प्रस्ताव; निर्णयाकडे लक्ष

कोल्हापुरातील कसबा बावडा येथील डी वाय पाटील विद्यापीठ आणि आकुर्डी येथील विद्यापीठाची जागा कोणाची आहे. त्याचे मूळ सातबारा बाहेर काढून तपासले पाहिजेत. या जमिनी नेमक्या कशा मिळवल्या हे उघड होईल असं विधान करून चंद्रकांत पाटलांनी खळबळ उडवून दिली आहे.

Chandrakant Patil Vs Satej Patil
Jalgaon Bank Election: एकनाथ शिंदेंच्या आमदारानं 'अदृश्य' शक्तीचा डाव उधळला; भाजपची कोंडी! आमदार पुत्राचा अर्ज वैध

सतेज पाटील यांनी गोकुळ मधील सत्तेच्या काळातच कोरमचा नियम आणलेला आहे. महायुती म्हणून आमच्याकडे 4400 इतकी मते होती. तर सतेज पाटील यांच्याकडे 900 मते होती. त्यांनी कोणत्या मार्गाने मत चोरी केले, असे नागरिकांनी विचारले पाहिजे असे देखील चंद्रकांतदादा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.