Kolhapur Politics : मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरच्या पदरात काय पडणार? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

Maharashtra cabinet expansion Kolhapur Politics: महायुतीला दहा पैकी दहा जागांवर यश मिळाले. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याने महायुतीला भरघोस यश दिल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेते कोल्हापूरच्या पदरात काय पडणार याकडे कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळणार याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

भाजप अपक्षासह तीन , जनसुराज्य दोन, शिवसेना तीन आणि राष्ट्रवादीला एक असे संख्याबळ झाले असताना त्याला किती कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळणार याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास मिळालेल्या महाविकास आघाडीला मात्र विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली. महायुतीला दहा पैकी दहा जागांवर यश मिळाले.

कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र चंदगडचे महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. मात्र मुश्रीफ यांचा पूर्वानुभव सलग सहाव्यांदा आमदार झाल्याने त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.

Kolhapur Politics
Kurla Best Bus Accident : कुर्ला बस अपघातानंतर पुणेकरांच्या 'त्या' आठवणी ताज्या ; 25 जानेवारी 2012 मध्ये काय घडलं होतं?

शिवसेनेतून मंत्रीपदावर तीन आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रकाश अबिटकर हे सलग तीन वेळा आमदार झालेत. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदार करण्याचा शब्द राधानगरी वासियांना दिल्याने त्यांच्या नजरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लागले आहेत.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे तिसऱ्यांदा आमदार झालेत. यापूर्वी त्यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद दिली आहे. ते देखील मंत्रीपदावर आग्रही आहेत. करवीरचे आमदार चंद्रदीप हे देखील आग्रही आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणाच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ टाकणार हे पहावे लागणार आहे.

Kolhapur Politics
Eknath Shinde: आठवलेंच्या खास शैलीत शिंदेंची सभागृहात तुफान टोलेबाजी; पटोलेंना चिमटा VIDEO पाहा

जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार असून त्यांचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाचेही दोन आमदार आहेत. आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रिपदावर आमदार विनय कोरे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी अनुभव आहे.

भाजपचे अमल महाडिक हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून कोणाच्या नावाला पसंती मिळणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com