Kolhapur Politics : कोल्हापुरातील राजकारण तापलं, महायुतीच्या उमेदवाराचे बॅनर फाडले

Radhanagari Bhudargarh Vidhan Sabha Constituency : राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण मतदानापूर्वीच तापले आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदेंचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार के.पी पाटील अशी लढत या मतदारसंघात होत आहे.
Radhanagari Bhudargarh Vidhan Sabha Constituency
Radhanagari Bhudargarh Vidhan Sabha Constituency Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 14 Nov : राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण मतदानापूर्वीच तापले आहे. महायुतीच्या शिवसेना शिंदेंचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार के.पी पाटील (K P Patil) अशी लढत या मतदारसंघात होत आहे.

शिवाय अपक्ष म्हणून ए.वाय पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानाला काही दिवस उरले असतानाच आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या प्रचारार्थ उभारण्यात आलेले बॅनर्स फोडण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

कोल्हापूर (Kolhapur) गारगोटी रोडवरील कावणे आणि मुदाळ येथील प्रकाश आबिटकरांचे बॅनर्स अज्ञातांनी फाडले आहेत. त्यामुळे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात आणि घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Radhanagari Bhudargarh Vidhan Sabha Constituency
Bhokardan Assembly Election: धक्कादायक : शरद पवार यांच्या उमेदवारावर दगडफेक; मराठवाड्यात नेमंक काय घडलं?

ते म्हणाले "विरोधकांच्या हाताला माणसे लागत नसल्याने त्यांचा रडीचा डाव सुरू आहे. जनतेला विश्वासात घेऊन कामे केले असती तर आज बॅनर फाडण्याची वेळ विरोधकांवर आली नसती. तुम्ही बॅनर फाडू शकाल पण जनतेच्या मनात असलेलं माझं स्थान पाडू शकत नाही. याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल."

Radhanagari Bhudargarh Vidhan Sabha Constituency
Dharashiv Assembly Election: ठाकरेंवरील निष्ठेमुळे नव्हे तर 'या' धमकीमुळे कैलास पाटील सुरतमधून माघारी फिरले, जुन्या सहकाऱ्याचा मोठा दावा

या मतदारसंघात के.पी पाटील विरुद्ध आमदार प्रकाश आबिटकर अशी लढत होत आहे. तर के.पी पाटील यांचे मेहुणे ए.वाय पाटील हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मतदारसंघातून तिरंगी लढत होत असून तिघेही आपलाच विजय होणार असा दावा करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com