
Kolhapur News, 13 Dec : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी दहा जागा निवडून आल्या. कोल्हापूर (Kolhapur) उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. या दोन मतदारसंघाला लागून असलेला करवीर विधानसभा मतदारसंघात ही युतीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा निसटता विजयी झाला.
महायुतीच्या (Mahayuti) या तिन्ही उमेदवारांना एकीचे फळ मिळाले. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने दाखवलेला एकीचा तोरा हद्दवाढीच्या समर्थनासाठी हे नवनिर्वाचित आमदार दाखवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून शहराची एकदाही हद्दवाढ झालेली नाही.
उपनगरातील सीमा रेषा वाढल्यानेही वाहतूक व्यवस्था, कचरा, पाणी या सर्व प्रश्नांचा बोजवारा उडाला आहे. अशातच हद्द वाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारांकडून हद्दवाढीचे गाजर दाखवले जाते. मात्र कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील आमदारांची भूमिका ही राजकीय सोयीची ठरली आहे.
या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढत असताना महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगला समन्वय दिसून आला. प्रचारासाठी अनेक मेळावे एकत्रितपणे घेतले. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) हे कोल्हापूर उत्तरचे आमदार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, दक्षिणचे आमदार अमल महाडिक, करवीरचे चंद्रदीप नरके यांच्या प्रचारात दिसले. इतकेच नव्हे तर केंद्रीय नेत्यांच्या प्रचार सभांही या सर्वांच्या समन्वयाने पार पडल्या.
युतीतील नेत्यांच्या एकीमुळेच सर्व उमेदवारांना घवघवीत यश मिळालं. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी शहरवासीयांना हद्दवाढीचे आश्वासन दिले आहे. मात्र, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत या तिघांची एकी दिसली. तिच एकी हद्दवाढीच्या मुद्यावर दिसणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बराचसा हा ग्रामीण भागात आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा हद्द वाढीमध्ये समावेश आहे. ग्रामीण भागाचा हद्द वाढीला विरोध आहे. हद्द वाढीला समर्थन केल्यास त्याचा राजकीय फटका बसू शकतो याची भीती आजही अनेक राज्यकर्त्यांना आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात सर्वच आमदार महायुतीचे आहेत. शहराची हद्दवाढ हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. या प्रश्नासाठी तीन आमदारांचे एकीचे बळ मिळणे महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.