ShivsenaUBT supports Rajendra Patil Yadravkar : संकटात साथ सोडली, शिंदेंच्या आमदारांना शिवसेना ठाकरे सेनाचा पाठिंबा

Uddhav Shiv Sena Supports Eknath Shinde Shiv Sena MLA Rajendra Patil Yadravkar in Kolhapur Shirol Municipal Election : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने पाठिंबा दिला आहे.
Rajendra Patil Yadravkar
Rajendra Patil YadravkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur municipal election : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संकटात सापडलेले शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या सहयोगी आमदाराला आता ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर नगरपालिकेचे शिरोळ, कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने पाठिंबा दिला आहे.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग येत असून शाहू आघाडीची बाजू अधिक भक्कम होत चालली आहे. आज सायंकाळी शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संघटक वैभव उगळे, तसेच कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासो सावगावे यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या महायुती – राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शवून शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

यामुळे शिरोळ तालुक्यातील महायुती (Mahayuti) राजर्षी शाहू आघाडीची ताकद लक्षणीयपणे वाढली आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही गट-तटाचा विचार न करता शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहोत. शहराच्या प्रगतीसाठी जे लोक विश्वासाने पुढे येत आहेत त्यांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.

Rajendra Patil Yadravkar
Satyajeet Tambe legal notice : आमदार तांबे शिंदेच्या शिलेदारावर संतापले; माफी मागा, बजावली 10 कोटीचा दावा ठोकण्याची नोटीस

शिवसेनेचे सहयोगी सदस्य ते मंत्री

2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आरोग्य राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती.

Rajendra Patil Yadravkar
Maharashtra ST revenue plan : प्रताप सरनाईकांची एसटी उत्पन्नवाढीची 'पंचसूत्री'!

ठाकरे गटाने राजकारण फिरवलं

2024 च्या विधानसभा निवडणुकीला शिवसेनेचेच सहयोगी म्हणून राजर्षी शाहू आघाडीतून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुतीतून निवडणूक लढवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. पण नगरपालिका निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com