Kolhapur Shiv Sena: कोल्हापुरातील शिवसेना ठाकरेगट काँग्रेसच्या गळाला, दोन प्रमुखांवर कारवाईचा बडगा?

Kolhapur Shiv Sena Politics: लोकसभेच्या जागा वाटपात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाकडे जाईल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र विधानसभेच्या मेरिटवर ही जागा काँग्रेसच्या पथ्यावर पडली.
Shiv Sena Thackeray group
Shiv Sena Thackeray groupSarkarnama

Kolhapur News: कधीकाळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात सहा आमदार असणाऱ्या शिवसेनेला (Shiv Sena) आज घरघर लागण्याची वेळ आली आहे. राज्यात शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाची अवस्था जिल्ह्यात ही तितकीच कमजोर बनली आहे.

सच्चा आणि कडवट शिवसैनिकांचे बळ शिवसेना ठाकरे गटामागे (Uddhav Thackeray) असले तरी जिल्ह्यातील निष्ठावंत म्हणून घेणारे प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या वळचणीला गेलेत. तशी चर्चाही निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. काही प्रमुखांच्या वाढलेल्या काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी संदर्भात तक्रारी मुंबईपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील काही प्रमुखांवर कारवाईची कुजबूज सुरू आहे.

Shiv Sena Thackeray group
Jalgaon Politics: भाजप बालेकिल्ला राखणार की गमावणार; 25 वर्षांनंतर जळगावमध्ये विरोधकांच्या यशाची परिक्षा

लोकसभेच्या जागा वाटपात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाकडे जाईल याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र विधानसभेच्या मेरिटवर ही जागा काँग्रेसच्या पथ्यावर पडली. वास्तविक पाहता विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने शिवसेना ठाकरे गटाने देखील या जागेवर आग्रह धरला होता. मात्र, ठाकरे गटाच्या प्रमुख शिलेदारांनीच मान टाकल्याने म्हणावा तसा दबाव तयार झाला नाही.

केवळ शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकरण इंगवले सोडल्यास ठाकरे गटाच्या एकाही प्रमुख नेत्याने आग्रह केल्याचे दिसून आले नाही. शिवाय शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर ठाकरे यांनी केलेली कारवाई त्याला कारणीभूत ठरली. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत झालेल्या जागा पेचाबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटातील निष्ठावंत ही काँग्रेसवर नाराज होते.

सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत केलेली बंडखोरी ही अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना पचलेली नाही. अशी उघड उघड भूमिका ही काही शिवसैनिकांनी बोलून दाखवली. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेसच्या वळचणीला गेल्याने त्यांनी तोंड बंद ठेवणेच पसंत केले. शिवाय दोघाप्रमुखांच्या रोज ठराविक वेळेत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्याची चर्चाही आहेत.अशा दोघांप्रमुखांवर कारवाई होणार असल्याची कुजबुज सध्या जोरात सुरु आहेत. मात्र त्यांची नावे काय हे अद्याप कळू शकले नाही.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com