

Sai Kharade Joins Shiv Sena : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडताना दिसत आहे. शिवसेनेने पुन्हा एकदा जोरदार धक्का काँग्रेसला दिला आहे.
शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी महापौर सई खराडे आणि शिवाजी पेठ प्रभागातून इच्छुक असणारे त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे यांच्यासह इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे भगवा ध्वज देवून शिवसेनेत स्वागत केले.
या पक्षप्रवेशासाठी कोल्हापूर उत्तरचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला. यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकरही उपस्थित होते. सई खराडे यांनी चंद्रेश्वर प्रभागातून दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले असून, 2005 मध्ये त्यांनी महापौरपद भूषविले होते.
माजी महापौर सई खराडे यांनी यापूर्वी चंद्रेश्वर प्रभागातून दोनवेळा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. सौ खराडे या माजी कृषी मंत्री दिवंगत श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी, तसेच कोल्हापुरातील गोरगरीब जनतेला न्याय देणारे एक प्रकारे खाजगी कोर्ट म्हणून ओळख असणारे जेष्ठ नेते दिवंगत महिपतराव बोंद्रे यांची कन्या, व कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व सन 1990 च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले, उमेदवार दिवंगत सखाराम बापू खराडे यांच्या त्या स्नुषा आहेत.
तर सई खराडे व अजित खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्यासह यांचा जाहीर प्रवेश माजी महापौर कोल्हापुर महानगरपालिका व सन 1999 च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले उमेदवार अॅड.महादेवराव आडगुळे यांचे चिरंजीव व सन 2010 साली महापालिका निवडणूकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेले. उमेदवार व सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत आडगुळे यांनी आज शिवसेनेत (Shivsena) जाहीर प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.