Satyajit Kadam : महापालिका निवडणुकीआधी महायुतीत घमासान; सत्यजित कदमांकडून थेट मुश्रीफ- पाटलांच्या मैत्रीवर बोट

Kolhapur politics News : सत्यजित कदम यांनी मुश्रीफ–पाटील मैत्रीवर टीका करत राष्ट्रवादीकडून लोकसभा–विधानसभेत शिवसेनेला मदत न झाल्याचा आरोप केला. महापालिका निवडणुकीत भूमिका स्पष्ट करण्याची त्यांनी राष्ट्रवादीला मागणी केली.
Satyajit Kadam addressing a Shiv Sena gathering while questioning NCP’s support and criticizing the Mushrif–Patil political friendship in Kolhapur.
Satyajit Kadam addressing a Shiv Sena gathering while questioning NCP’s support and criticizing the Mushrif–Patil political friendship in Kolhapur.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur politics Mushrif, Patil : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या मैत्रीवर नेहमीच महाडिक गटाने सडाडून टीका केली आहे. त्यातच आता भाजपमधून शिवसेनेत गेलेले सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी अप्रत्यक्षपणे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीवर थेट टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेनेला अपेक्षित मदत झाली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे संधान असते. त्यातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणल्याचा प्रयत्न केला जात नसल्याचा आरोप सत्यजित उर्फ नाना कदम यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची अशीच भूमिका राहत असेल तर महायुती धर्म म्हणून तो योग्य ठरणार नाही. राष्ट्रवादीने आपली भूमिका आत्ताच स्पष्ट करावी, असे थेट आव्हान सत्यजित उर्फ नाना कदम यांनी व्यासपीठावरून केला आहे.

प्रत्येक वेळी महापालिकेत शिवसेनेचे 4 - 5 नगरसेवक असे टोमणे मारले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. विधानसभेत आपण बाजी मारली. तीच उर्जा घेवून महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. युती झाली तर प्रामाणिकपणे काम करुया. शिवसैनिकांवर कोणी अन्याय करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. आता इशारा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी दिला.

Satyajit Kadam addressing a Shiv Sena gathering while questioning NCP’s support and criticizing the Mushrif–Patil political friendship in Kolhapur.
Mahayuti Conflict : महायुतीतील खदखद बाहेर आली; फुटलेला हा बांध काय-काय वाहून नेणार?

शिवसेनेच्या विरोधात कोणीही डमी उमेदवार येता कामा नये .हिंदुत्व जपण्याचे काम शिवसेनेन केले आहे. लाडक्या बहिणीही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. शिंदे साहेबांचे राज्यातील आणि आमदार क्षीरसागर यांचे जिल्ह्यातील काम लोकांपर्यत घेवून जावा. विधानसभेप्रमाणे याही निवडणुकीत कॉंग्रेस नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या काळात अनेकजण बदनामीकारक वक्तव्यांसाठी पुढे येतील, पण त्यांच्या टीकाना भिक न घालता आपले व्हिजन मतदारांपर्यंत नेवूया, असे आवाहन केले.

Satyajit Kadam addressing a Shiv Sena gathering while questioning NCP’s support and criticizing the Mushrif–Patil political friendship in Kolhapur.
winter session special reason : हिवाळी अधिवेशनात 'राजकीय 'बॉम्ब' फुटणार! विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा 'या' दिवशी कामकाज

महापालिकेवर भगवा फडकवूया

नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद द्या असे आदेश शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थिती महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याची जबाबदार पदाधिकारी आणि शिवसैनिकांचीच आहे. शिवसैनिक पेटून उठले तर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसत नाहीत. हे प्रत्येक निवडणुकीत दाखवून दिले आहे.

महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ते पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आताच्या निवडणुकीत शिवसैनिकांना मिळणार आहे. वातावरण चांगले आहे म्हणून गाफील राहू नका, एकसंघ रहा आणि महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com