Kolhapur Politics : ताफ्यात गाडी आमदार क्षीरसागरांची, प्लेट पोलिसांची, अनधिकृत कृत्याचा ठाकरेंच्या शिलेदाराकडून भांडाफोड

Rajesh Kshirsagar Car Controversy : कोल्हापुरातील शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ अद्यापही सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांच्या पराक्रमाचा भांडाफोड केला आहे.
Ravikiran Ingwale, MLA Rajesh Khirsagar
Ravikiran Ingwale, MLA Rajesh Khirsagar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 Aug : कोल्हापुरातील शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांचा खेळ अद्यापही सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांच्या पराक्रमाचा भांडाफोड केला आहे.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ताफ्यात असलेली स्वतःच्या मालकीच्या गाडीवर पोलिसांचे स्टिकर वापरत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे.

राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ यावर कारवाई करावी अन्यथा आमदार क्षीरसागर यांचा ताफा अडवण्याचा इशारा इंगवले यांनी दिला आहे. कोल्हापुरातील शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या MH09 FY 3784 या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी क्षीरसागर यांच्या मालकीचे आहे.

Ravikiran Ingwale, MLA Rajesh Khirsagar
Raj Thackeray : उंदराचं उदाहरण देत राज ठाकरेंनी कबुतराचा मुद्दा उचलला, जैन समाजाला दिल्या कानपिचक्या

संबंधित गाडी खाजगी असल्याने त्यावर पोलीस लिहिता येत नाही. शिवाय त्या नावाचा उपयोग करता येत नाही. मात्र क्षीरसागर यांच्या ताब्यात स्वतःचीच मालकीची गाडी ठेवून त्यावर पोलीस असे स्टिकर लावून शहर वर फिरवत असल्याचा आरोप ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.

खासगी गाडीवर शासकीय स्टिकर वापरणे मोटरवाहन कायद्यानुसार गुन्हा असूनही पोलिसांनी कारवाई न करणे म्हणजे डोळेझाक केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा गाड्यांचा वापर खंडणीवसुली, तस्करी किंवा गैरव्यवहारांसाठी होऊ शकतो, अशी शंका उपस्थित केली आहे.

Ravikiran Ingwale, MLA Rajesh Khirsagar
Raigad Boat Capsize: करंजा गावाजवळ समुद्रात बोट बुडाली; लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल

तर "सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता आणि शिवसेना सडेतोड उत्तर देईल. पोलिसांनी लवकरात लवकर या गाडीवर कारवाई करावी. अन्यथा शिवसैनिक दिसेल तिथे ही गाडी अडवतील आणि हिंमत असेल तर राजेश क्षीरसागरांनी ती गाडी शिवसैनिकांच्या ताब्यातून सोडवून दाखवावी, असं आव्हान रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com