
Shivaji University renaming : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार व्हावा या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. त्याबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपच्या आमदारांकडून अधिवेशनात मागणी झाल्याने या आंदोलनाची धग वाढली आहे. मात्र महायुतीच्या आमदारांनी केलेल्या मागणीनंतर कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच ढवळले आहे.
' आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ' असे घोषवाक्य देत शाहू सेनेकडून या नामविस्ताराला विरोध करण्यात आला आहे. तर अनेक संघटनांनी आणि जाणकार व्यक्तींनी या नामविस्ताराच्या मागणीला विरोध केला आहे. मात्र एरवी महायुतीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील या मागणीला समर्थन मिळत आहे. आज झालेल्या मेळाव्यात ठाकरेंची शिवसेनेचे शिलेदार या मेळाव्यात उपस्थित होते.
महायुतीकडून भाजपचे(BJP) आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रदीप नरके यांच्याकडून अधिवेशनात कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. तर त्यापूर्वी खासदार धैर्यशील माने यांनी देखील विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी केली होती. मात्र काही संघटनांकडून याला विरोध करण्यात आला. यासंदर्भातील बैठक घेत प्रसंगी नामविस्तार करणाऱ्यांना हाणून काढण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. आज या मागणीसाठी जनजागृती समितीकडून मोर्चा काढण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव द्यावे, यासंदर्भातील झालेल्या मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी(Shivsena) देखील सहभाग नोंदवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इतर वेळी महायुतीच्या प्रत्येक मागणीवर तुटून पडणारे ठाकरेंची शिवसैनिक या मागणीला समर्थन देताना दिसले. शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, तालुकाध्यक्ष राजू यादव, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने यांच्यासह असंख्य पदाधिकारी यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनपेक्षितपणे पाठिंबा मिळाल्याने हिंदू जनजागृती समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे हे प्रचलित नावच आहे तसे असू द्या. हेच नाव आदरपूर्वक घेतले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोल्हापूरची अस्मिता आणि प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे प्रचलित असलेले शिवाजी विद्यापीठाचे नाव आहे तसेच ठेवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून(NCP) करण्यात आली. बाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.