Pune Congress : काँग्रेसला खिंडार! पुण्यात राजीनामा सत्र सुरूच, बड्या नेत्यांसह 100 जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

Congress Faces Setback : पुण्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील बड्या नेत्यांसह 100 जण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
Pune Congress
Pune Congresssarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यामध्ये सध्या काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता पुण्यातील काँग्रेसमध्ये आऊट गोईंग सुरू झाले असून पक्षातील बड्या नेत्यांसह 100 जण राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या चर्चांमुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून असे झाल्यास काँग्रेससाठी मोठा धक्का असेल.

काहीच दिवसांच्या आधी काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याच्याआधी त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे अनेकदा सांगितले होते. पण नंतर त्यांनी मुंबई गाठत भगवा हातात घेतला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का असतानाच याही पेक्षा मोठा धक्का आता बसण्याची शक्यता आहे.

पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह 100 पदाधिकारी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात ते आपला राजीनामा देणार असून यातील काही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. तर या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही भेट घेतल्याचे आता दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Pune Congress
Congress Politics : 'देवेंद्र फडणवीस औरंगजेबाइतकेच क्रूर, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसायचाय', काँग्रेसची जहरी टीका

काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसला गळती लागली आहे. पुणे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसच्या चिंतेची बाब म्हणजे रोहन सुरवसे पाटील आणि कृष्णा साठेच पक्षाला रामराम करत नसून 100 पदाधिकारी येत्या दोन ते तीन दिवसांत राजीनामा देणार आहेत. या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली असून राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटात अनेक पदाधिकारी प्रवेश करतील अशीही चर्चा सुरू आहे.

Pune Congress
Ratnagiri Congress : दौरा तर झाला, पण हर्षवर्धन सपकाळसाहेब, 'हाता'ला सपोर्ट देऊन 35 वर्षांच्या धडपडीला बळ देणार का?

धंगेकरांचा रामराम

काही दिवसांपूर्वीच कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी धंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. धंगेकर यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर ते नाराज होते. तर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर नाही नाही म्हणत, शेवटी त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतला. याप्रवेशानंतर आता पुण्यातील काँग्रेसला गळती लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com