कारवाईच्या भीतीने घेतला आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा बळी

गेल्या सात दिवसांपासून एसटी (ST) कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप (Strike) मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Kolhapur ST STand
Kolhapur ST STand
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राज्यात गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. राज्यशासनानेही या संपाच्या विरोधात कठोर भुमिका घेत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र या कारवाईच्या भितीने कोल्हापूरात एका एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनिल मारुती कांबळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अनिल कांबळे हे कोल्हापूरच्या गारगोटी जवळील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी होते. 2015 साली कामावर कोल्हापूर एसटी आगारात सेवेत रुजू झाले होते. सध्या सावंतवाडी आगार चालक कम वाहक म्हणून काम करत होते. संप असल्याने ते मडीलगे येथे राहायला होते. राज्यशासनाने केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा इशारा दिल्याने ते प्रचंड तणावात होते. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. कांबळे यांच्या जाण्याने कोल्हापूरातील एसटी आगारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kolhapur ST STand
`महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल`

गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र दूसरीकडे एसटीच्या संपामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन राज्य शासनाने केलं आहे. तसेच, कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाकाही लावला आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनिल कांबळे यांनी हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com