Kolhapur Police : PSI नेच उरकली 3 लग्न; बायकोच्या तक्रारीनंतर अंगावरची खाकी गायब: दाखवला घरचा रस्ता

Police Sub-Inspector suspended : कोल्हापूर पोलीस दलाची बदनामी झाल्याने पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
Kolhapur Police
Kolhapur Policesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वतःच्या बायकोला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून आज (ता.10) निलंबित करण्यात आले. शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याच्या विरोधात त्याच्याच बायकोने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस उपनिरीक्षकाचे पहिले लग्न झाले असताना ती माहिती लपवून बेकायदेशीर रित्या दुसरे लग्न केले. सातत्याने वाद होत असताना तिसरे लग्न केले. आता बायकोने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांनी मुल्ला याला निलंबित केले.

पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी २०19 च्या दरम्यान विवाह झाला होता. यावेळी इम्रान मुल्ला हा गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार अफ्रीन मुल्ला यांच्यासोबत सातत्याने वाद होत होते. शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने आफरीन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.

गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान पत्नी आफरीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर 2015 साली पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. मात्र कायदेशीर रित्या घटस्फोट न झाल्याची माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह केल्याचे समोर आले आहे.

Kolhapur Police
Nagpur police stations : 'क्राईम सिटी'चा डाग पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात सहा नवीन पोलिस ठाणे!

पोलीस उपनिरीक्षक मुल्ला याने इतक्यावरच न थांबता 23 जून 2024 रोजी तिसरे लग्न केल्याची माहिती आफरीन मुल्ला यांना मिळाली. आपल्यासोबत कायदेशीर रित्या तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र कोणतेही कारवाई होत नसल्याने अखेर माहिती अधिकारात यांनी पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा केला.

यानंतर इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता, सुहाना कुमार याच्याशी माझं लग्न झालेलं नाही ती माझी मैत्रीण आहे. असा खुलासा त्यांनी केला होता. तर आफरीन मुल्ला हीच आपली पहिली पत्नी असल्याचं स्पष्टीकरण दिले होतं.

पण मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान इम्रान मुल्ला यांनी दिली आहे. त्यामुळे तिसरं लग्न मी कायदेशीर रित्या केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या तपासानंतर इम्रान मुल्ला याचे सुहाना कुमार यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे आता उघड झाले आहे. शिवाय एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला याच्याशी लग्न झाल्याची कबुली देण्यात आल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

Kolhapur Police
Kolhapur Police : पोलिसांमध्ये पायताणाची मोठी दहशत; कोरटकरमुळे कोल्हापुरकरांवर आली अनवाणी फिरण्याची वेळ

दरम्यान इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे इरफान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलाची बदनामी झाल्याचे स्पष्ट करत आज इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com