Nagpur police stations : 'क्राईम सिटी'चा डाग पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात सहा नवीन पोलिस ठाणे!

New Police Stations in Nagpur District Announced : या पोलिस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
six new police stations in Nagpur district to erase the city's 'crime city' image and strengthen law enforcement
six new police stations in Nagpur district to erase the city's 'crime city' image and strengthen law enforcementSarkarnama
Published on
Updated on

Nagpur law and order : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर गृहजिल्हा असल्याने प्रत्येक घटना आणि घडामोडीकडे सर्वांचे लक्ष असते. छोटासा जरी गुन्हा घडला तरी त्यास गृहमंत्र्यांशी जोडल्या जाते. विरोधकांमार्फत नागपूर क्राईम सिटी झाल्याचा आरोप प्रत्येक हिवाळी अधिवेशनात केला जातो.

हे बघता नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पोलिस ठाण्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

six new police stations in Nagpur district to erase the city's 'crime city' image and strengthen law enforcement
Utpal Parrikar : मनोहर पर्रीकरांचे पुत्र भाजपच्या वाटेवर? ; म्हणाले ''तिकीट कापले म्हणून पक्ष...''

भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहविभाग होता. महायुतीच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि आता पुन्हा गृहखाते फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवून घेतले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो‘ अहवाल सादर करते. या अहवालाचा दाखला देऊन राज्य आणि त्यातही नागपूरमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी घेऊन विरोधक मुख्यमंत्र्यां आरोप करीत असतात.

नागपूर जिल्ह्यातील वडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होलीबारा या सहा ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना राबवता येणार आहेत. नागपूर ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ सहकार्य मिळण्यासाठी पोलिस ठाण्यांची गरज होती. आम्ही या प्रकल्पाला प्राधान्य देत आहोत आणि या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. आमचे लक्ष्य हे पोलिस ठाणे लवकरात लवकर कार्यरत करणे आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असे नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

six new police stations in Nagpur district to erase the city's 'crime city' image and strengthen law enforcement
Rahul Gandhi latest news : ''भाजप अन् 'RSS'ला फक्त काँग्रेसच रोखू शकते बाकी पक्ष नाही, कारण...'' ; राहुल गांधींचं मोठं विधान!

नवीन पोलिस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा भाव वाढेल. नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल असे सांगून महसूल मंत्री बावनकुळे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पाला प्राधान्य देऊन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com