Kolhapur News, 06 Dec : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी काल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनेक प्रश्न घेऊन शिक्षक रस्त्यावर उतरले असताना या आंदोलनात शिक्षक मतदार संघ आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील इच्छुकांची सलामी पाहायला मिळाली.
या मतदारसंघातील पाच ते सहा जिल्ह्यांचा समावेश असला तरी पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील इच्छुकांनी कोल्हापुरातूनच सलामी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महायुतीच्या उमेदवारांबरोबरच महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार आणि या आंदोलनातून उपस्थित होते.
निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवघी असला तरी आतापासूनच इच्छुक मैदानात दिसत आहेत. 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटीची अट रद्द करावी. गट मान्यतेसाठीचा जीआर रद्द करावा आणि जुने मानके लागू करावीत. ऑनलाइन आणि शैक्षणिकेतर कामांचा भार शिक्षकांवर टाकणे थांबवावे.
यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षकांनी काल काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले होते. कोल्हापुरात देखील हजारोंच्या संख्येने शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील इच्छुकांची भाऊगर्दी पहायला मिळाली.
या इच्छुकांनी प्रत्येकाने आपला गट या आंदोलनाच्या निमित्ताने कार्यरत ठेवला होता. दसरा चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये जागोजागी या इच्छुकांचे शिक्षक कार्यकर्ते आपल्या उमेदवाराबाबत फील्डिंग करताना दिसले. शिवाय हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर इच्छुकांच्या हातात माईक देण्यापर्यंत ते प्रत्येकाचे भाषण होईपर्यंत या शिक्षक कार्यकर्त्यांनी या इच्छुक उमेदवारांची सोय केली होती.
दरम्यान, या आंदोलनादरम्यान इच्छुकांची देखील तितकीच गर्दी पाहायला मिळाली. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर हे देखील उपस्थित होते. तर महायुती मधून इच्छुक असलेले पुणे पदवीधर चे भाजपचे संभाव्य उमेदवार शरद लाड, शिक्षक मतदार संघातून भैय्या माने, विजयसिंह माने, या इच्छुकांची देखील या मोर्चादरम्यान वर्दळ पाहायला मिळाली.
महिनाभरापूर्वी पुणे पदवीधरचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतर त्यांना पदवीधरची उमेदवारी मिळेल. असा शब्द दिल्याचा दावा लाड हे करताना दिसत आहेत. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांना उमेदवार म्हणून पुढे आणले आहे.
कोल्हापूर जिल्हा पदवीधर मतदार संघासाठी आतापर्यंत 80,180, इतकी मतदार नोंदणी झाली आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी 8,631 इतकी मतदार नोंदणी झाली आहे. सांगली सातारा सोलापूर पुणे जिल्ह्यापेक्षा पदवीधर मतदारसंघाची नोंदणी ही कोल्हापूर जिल्ह्यात अधिक आहे. आगामी काळात शिक्षक मतदार नोंदणी देखील अधिक होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत जवळपास 32% मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातून झाल्यानंतर सर्वच इच्छुकांचे लक्ष कोल्हापूर जिल्ह्यावर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.