Shivsena UBT : खैरेंच्या विरोधानंतरही दानवे माजी आमदाराला घेऊन ठाकरेंच्या भेटीला : मातोश्रीवर काय घडले? सांगितली Inside Story

Matoshree visit update News : 2019 ची लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव सध्या बेचैन आहेत. यातूनच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरवापसीची तयारी सुरू केली आहे.
harshvardhan jadhav, uddhav thackeray
harshvardhan jadhav, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Shiva Sena ubt news : माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे एक अजब रसायन आहे. ते कोणत्या वेळी काय निर्णय घेतील? याचा काही भरोसा नाही. अपक्ष, मनसे, शिवसेना त्यानंतर स्वतःचा पक्ष आणि आता कुठल्याच पक्षात नाही, असा त्यांचा राजकीय प्रवास. 2019 ची लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे हर्षवर्धन जाधव सध्या बेचैन आहेत. यातूनच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरवापसीची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेचे (Shivsena) नेते अंबादास दानवे यांच्या माध्यमातून शुक्रवारी त्यांनी थेट मातोश्री गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे दुसरे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध आहे. असे असताना अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन जाधवांना उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. त्यामुळे जाधव यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. परंतु, आपल्या धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मातोश्रीतून बाहेर पडताच आपल्याबद्दल सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले.

harshvardhan jadhav, uddhav thackeray
BJP Vs Shivsena : बोर्ड फाडले, लाथा घातल्या, कानाखाली मारल्या... वरळीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भाजप-ठाकरेंच्या सेनेत तुफान राडा

उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्याशी आपली भेट झाल्याचे कबूल करतानाच या भेटीत पक्षप्रवेशावर कुठलीही चर्चा झाली नाही. माझी वैद्यकीय स्थिती आणि उद्धव ठाकरे साहेबांची वैद्यकीय स्थिती याशिवाय देशाच्या अर्थकारणावर आमच्यात चर्चा झाल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले.

harshvardhan jadhav, uddhav thackeray
AJit Pawar dance video : लाडक्या लेकाच्या लग्नात अजितदादांचा भन्नाट डान्स : व्हिडीओ पाहिलात का?

हर्षवर्धन जाधव आता मशाल हाती घेणार अशी चर्चा माझ्या मतदारसंघात विद्यमान आमदार आणि माझे विरोधक करत आहेत. पण उद्धव ठाकरे यांची मी भेट घेतली म्हणजे माझा पक्षप्रवेश झाला किंवा त्याची काही चर्चा या भेटीत झाली असे समजण्याचे कारण नाही. आमच्या भेटीमध्ये राज्यातील सद्य राजकीय परिस्थिती, देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थिती यावर आपल्याला काय करता येईल या आणि इतर अन्य विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षप्रवेशाबद्दल नेमकी काय चर्चा झाली हे हर्षवर्धन जाधव तूर्तास तरी जाहीर करणार नाही एवढे निश्चित आहे.

harshvardhan jadhav, uddhav thackeray
Beed teachers suspension : बीड जिल्हा परिषदेचे १४ शिक्षक निलंबित; 'या' कारणामुळे केली सीईओने कारवाई

चंद्रकांत खैरे यांचा मोठा अडथळा हर्षवर्धन जाधव यांच्या घरवापसीत असणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अंबादास दानवे हे हर्षवर्धन जाधव यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीवरूनच खैरे प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी अंबादास दानवे यांना हर्षवर्धन जाधवच्या घरी जाण्याची गरज काय होती? आपल्याकडे निष्ठावंत पदाधिकारी, शिवसैनिक असताना गद्दारी करणाऱ्या आणि उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेबद्दल असभ्य भाषा वापरणाऱ्या हर्षवर्धन जाधवला पक्षाची गरज आहे का ?असा सवाल केला होता. कुठल्याही परिस्थितीत हर्षवर्धन जाधव यांना आपण शिवसेनेत घेऊ देणार नाही, असा ठाम इशारा खैरे यांनी दिला.

harshvardhan jadhav, uddhav thackeray
Maharashtra Teachers Strike : शिक्षक संघटना आक्रमक! वेतन कपातीच्या आदेशानंतरही राज्यातील तब्बल 80 हजार शाळा बंद

त्यानंतरही अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना मातोश्रीवर नेत उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणली. त्यामुळे आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खैरे विरुद्ध दानवे असा संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हर्षवर्धन जाधव यांचा पक्ष प्रवेश होईल तेव्हा होईल परंतु त्या आधीच त्यांनी मशालीत आग लावण्याचे काम केले आहे.

harshvardhan jadhav, uddhav thackeray
Nagpur NCP : आता उमेदवारांनी स्ट्रॉंगरुम समोर झोपायचे का? सुरक्षा धोक्यात, पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com