Kolhapur Mahapalika Ward: मोठी बातमी: कोल्हापुरात प्रभाग रचनेवरुन राजकीय तमाशा होणार, बायका-पोरांसह स्वत:साठीही डाव टाकला

Kolhapur Municipal Corporation Ward Structure: कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागून राहिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व यंत्रणा गतिमान झाली होती.
Kolhapur Municipal Election 2025
Kolhapur Municipal Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागून राहिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व यंत्रणा गतिमान झाली होती.

मुंबई महापालिका वगळता सर्वच महापालिका निवडणुका या चार सदस्य प्रभाग रचनेनुसार घ्याव्यात अशा सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर कोल्हापुरात (Kolhapur) नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आले. जवळपास २० मतदार संघ नव्या प्रभाग रचनेनुसार जाहीर केल्या असून केवळ एक मतदार संघ हा पाच सदस्य संख्येचा असणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ जाहीर झाल्यानंतर त्याला महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींनी न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्याला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी त्यांनी देखील राज्य सरकारला इशारा दिला आहे. आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघात तोडफोड करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज लोकप्रतिनिधी बांधला आहे.

नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत (Kolhapur Municipal Corporation Ward Structure) राज्यातील सत्ताधार्यांनी आपल्याला पूरक असा मतदारसंघ बांधून घेतला असल्याचा देखील आरोप विरोधकांनी केलेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीतून अनेकजण इच्छुक आहेत. प्राथमिक टप्प्यात प्रभाग रचना शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला पूरक असल्याचे चित्र दिसत आहे. कोणी मुलासाठी, कोणी बायकोसाठी तर कोणी स्वतःसाठी प्रभाग सोयीस्कर करून घेतल्याचा आरोप विरोधाकडून खाजगीत सांगितले जाते. त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ठेवली असल्याचा इशारा देण्यात येत आहे.

Kolhapur Municipal Election 2025
Mahayuti Controversy: जरांगेंनी दमछाक केल्यानंतर फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता मिटवला,पण महायुतीत नाराजीचा उद्रेक...

प्रशासनाचे सर्व अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेची झालेली सगळी प्रक्रिया पारदर्शकपणे, सर्वाधिकार्‍यांनी मेहनत घेऊन केलेली आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप हे प्रत्येक वेळी होतच असतात. नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षाची सत्ता 100% येणार आहे.

कारण कोल्हापूरचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आता प्रश्नच काही उरलेले नाहीत. कोल्हापूरच्या हद्दवाडीचा मुद्दा लवकरच मार्गी लागणार आहे.चाळीस वर्षांपासून प्रलंबित सर्किट बेंच चा प्रश्न याच सरकारने सोडवला आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्याकडे आवाज उठवण्यासाठी काही उरलेलं नाही. प्रचंड मताने निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, अशा प्रचंड मताने आमचे उमेदवार निवडून येतील. असा विश्वास भाजपचे नेते महेश जाधव यांनी व्यक्त केला.

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मात्र या प्रभाग रचनेवर प्राथमिक आक्षेप नोंदवला आहे. प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने आखली गेली असेल, सत्तेचा गैरवापर अशा पद्धतीने केला गेला असेल तर निश्चितच आम्ही त्या विरोधात आवाज उठवून लढा देऊ. जिल्हा परिषद मतदार संघाबाबत देखील चुकीच्या पद्धतीने मतदार संघ तयार करण्यात आले आहेत. संदर्भात सर्किट बेंचमध्ये रीट पीटिशन दाखल केलं आहे. त्यानुसार महानगरपालिकेतील प्रभाग रचनेवर देखील हरकती घेणार आहे. महापालिकेत देखील आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही हरकत घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली.

काही इच्छुक समाधानी...

नव्या प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त केला आहे. काही बड्या कारभाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्या प्रभागात आणि ज्या कॉलन्यांमध्ये अशा इच्छुकांचं प्रभाव आहे. त्याच कॉलनी आपल्या मतदारसंघात आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.

जाहीर झालेली प्रभाग रचना ही भाजप आणि शिवसेनेला पूरक आहे. या रचनेत आपल्या बायको आणि मुलाची काळजी आता घरी नेत्यांनी घेतलेली दिसते. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आणि ठाकरे यांचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांना विशेष करून सत्ताधाऱ्यांनी टार्गेट केल्याची दिसते. आम्ही उत्तर विधानसभा मतदारसंघात असताना दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सदर आमच्या प्रभागात आणले आहेत.

मात्र, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढायला शिकवला आहे. तिथे आम्ही लढून आणि जिंकून दाखवणार अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com