Kolhapur Politics : थेट पाइपलाइनचा वाद पुन्हा पेटला; भाजपनं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केलं टार्गेट...

BJP Vs Congress : भाजपने थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्यावर टिपर घोटाळ्याचा आरोप केला आहे.
Congress and BJP news
Congress and BJP newsSarkarnama

Kolhapur : थेट पाइपलाइनचे पाणी कोल्हापुरात आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलेच आरोप- प्रत्यारोप झाले. सध्या कुठे हा वाद शांत झाला होता, पण या संपूर्ण प्रकारावर शांत असलेल्या भाजपने मात्र थेट पाइपलाइनचा मुद्दा पुन्हा तापवला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी नुकतेच महापालिका चौकात कचराप्रश्नासंदर्भात आंदोलन केले. त्यावरून भाजपने थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना टार्गेट करत त्यांच्यावर टिपर घोटाळ्याचा आरोप केला आहे.

थेट पाइपलाइनचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेसकडून कचराप्रश्‍नी आंदोलन केले असल्याचा आरोप भाजपने परिपत्रक काढून केला आहे. थेट पाइपलाइनमध्ये आलेले अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी कचऱ्याचा प्रश्‍न उचलून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. कचरा उचलण्यासाठी घेतलेल्या टिपर खरेदीत कॉंग्रेसच्या कालावधीत मोठा ढपला पाडला आहे, असे पत्रक भाजपच्या माजी नगरसेवकांनी दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress and BJP news
Baban Shinde : अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला सहा महिन्यांची शिक्षा...

ढिसाळ नियोजन

ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे व किरण नकाते यांनी दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे, नुकतेच त्यांनी कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या उद्दिष्टाने आंदोलन केले. ते थेट पाइपलाइनमधील अपयश झाकण्यासाठी केलेले खोटे आंदोलनच होते. दरवर्षी पंधराव्या वित्त आयोगामधून ५० कोटी रक्कम स्वच्छता अभियानासाठी मिळते. १२३ कोटी रक्कम कचरा उठाव व नियोजनासाठी मिळाली आहे. १५ वर्षांपासून काँग्रेसची महानगरपालिकेवर सत्ता आहे. त्यांच्या ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचारामुळे या निधीचा विनियोग नीट करता आलेला नाही.

श्रेयवादातून गडबडीत उद्‍घाटन...

सत्ता असतानाही कोणतेही कार्य न करता आता थेट पाइपलाइन योजना पूर्ण होण्यापूर्वीच केवळ श्रेयवादातून गडबडीत उद्‍घाटन केले. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता कॉंग्रेसच्या कारकिर्दीमध्येच एक बनावट कंपनी आली व तिला वीजनिर्मिती प्रकल्पाचा ठेका देण्यात आला. पण ती कंपनी काम सोडून पळून गेली. टिपर काँग्रेसच्या कालावधीत विकत घेतले. ते निकृष्ट दर्जाचे असून, त्याच्यामध्ये पूर्ण क्षमतेने कचरा उचलण्याची व्यवस्था नाही.

Congress and BJP news
Jitendra Awad : 'बापाची चप्पल घातली म्हणून बाप होता येत नाही; आव्हाडांनी अजितदादांना सुनावलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com