Baban Shinde : अजित पवार गटाच्या आमदार पुत्राला सहा महिन्यांची शिक्षा...

RanjitSingh Shinde News : कारखान्याने सिंडिकेट बँकेचा पाच कोटींचा धनादेश दिला होता.
RanjitSingh Shinde News
RanjitSingh Shinde News Sarkarnama
Published on
Updated on

Madha : धनादेश न वटल्याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष माढा विधानसभेचे अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार रणजितसिंह शिंदे व रणजित बोरावके यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाच्या न्याय दंडाधिकारी ट्विंकल चावला यांनी सैनिक फूड्स लिमिटेड कंपनीला साडेसात कोटींची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे. त्यांना सहा महिने साध्या करावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अध्यक्ष असलेल्या कर्नाटकातील इंडियन शुगर या साखर कारखान्याचे सैनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत साखर पुरवण्याचा करार झाला होता.

RanjitSingh Shinde News
Sanjay Raut : भाजपला Exit Poll मुळे फुटला घाम ! चारही राज्यांत काँग्रेसचे सरकार येणार; राऊतांचा दावा

त्याच्यासाठी कंपनीने दहा कोटी रुपये दिले होते. त्यासाठी साखर कारखान्याने 5200 मेट्रिक टन साखर पुरवणे अपेक्षित होते, परंतु 2016-17 मध्ये 1942 टन साखर पुरवली, त्यामुळे कारखान्याकडून 8 कोटी 39 लाख रुपये येणे होते, तर त्यांच्याकडून कंपनीला 10 कोटी 62 लाख 89 हजार रुपये येणे होते. त्यासाठी कारखान्याने सिंडिकेट बँकेचा पाच कोटींचा धनादेश दिला होता.

खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही. त्यामुळे कंपनीने दिल्लीच्या न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व रणजित बोरावके यांना कंपनीला साडेसात कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आणि सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच्यामुळे माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Edited by: Mangesh Mahale

RanjitSingh Shinde News
Sangram Jagtap : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आमदार संग्राम जगतापांच्या कानपिचक्या; रोख नेमका कोणाकडे ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com