Kolhapur News, 17 Apr : कोल्हापूर महानगरपालिकेची जलसंपदा विभागाकडे थकीत असलेली पाणीपट्टी तात्काळ भरावी, असा आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला दिला आहे. महापालिकेने एकूण थकीत पैकी तातडीने दहा कोटी भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, बुधवारी विखे पाटील यांनी उर्वरित थकबाकीत सूट देण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येईल, असं वक्तव्य केलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत एक बैठक पार पडली. यावेळी त्यांनी संबंधित सूचना दिल्या आहेत.
जलसंपदा विभागाची कोल्हापूर महानगरपालिकेकडे जवळपास तब्बल 62 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यापूर्वी कोल्हापूर महापालिकेकडून आठ कोटी रुपयांची भरणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. उर्वरित रकमेतील 10 कोटीची रक्कम दोन टप्प्यात भरावी, अशी सूचना विखे पाटील यांनी केली आहे.
उर्वरित रक्कम संदर्भात जलसंपदा विभाग आणि कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान 2025 पासून ते 2031 पर्यंत पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी जलसंपदा विभागाकडे कोल्हापूर पालिकेने करार केला आहे. तसंच महापालिकेकडून बिल वसूली संदर्भात आता शहरवासीयांना प्रति महिना पाण्याचे बिल भरण्याचे नियोजन केले जाणार असल्याचंही के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितलं.
कोल्हापूर महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील नियोजन शून्यतेचा फटका आता पाणीपट्टी वसुलीवर देखील होताना दिसत आहे. यंत्रणेवर नियंत्रण नसल्यानेच अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांच्या लागेबंधामुळे पाणी पुरवठा करण्याचे धोरण आता महापालिकेच्याच अंगलट येत असल्याचं बोललं जात आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.