Mumbai News, 17 Apr : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यातील सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीत आपलं वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीने कार्यकत्यांना बळ देण्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी तालुकास्तरावर तर दुसऱ्या शनिवारी जिल्हास्तरावर आणि तिसऱ्या शनिवारी राज्यस्तरावर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी (ता.16) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर बैठका घेण्यात येणार आहेत.
शिवाय तालुका जिल्ह्यासह राज्यस्तरीय बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. या बैठकीत कार्यकत्यांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दंड थोपटल्याचं पाहायला मिळत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.