

Kolhapur News, 10 Feb : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने मॅजिक फिगर गाठली असून तब्येत 51 जागांवर विजय मिळवला आहे. 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केवळ 17 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा पडत नाही जवळपास निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. अडीच वर्षाच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असल्याने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच असणार आहे. मात्र तत्पूर्वी सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्यानंतर राष्ट्रवादीने या अध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडी सोबत चंदगडमध्ये आमची आघाडी असल्यामुळे शिरोळमध्ये आलेल्या पाच जागा हा देखील आमच्याच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून तब्बल चिन्ह 25 जागांवर आमचा विशेष झाला आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष पदावर दावा केला असून जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होईल हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल चौघापैकी एका या अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते. गिजवणे जिल्हा परिषद मधून निवडून आलेल्या शैलेजा सतीश पाटील यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याचे पती सतीश पाटील हे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते.
शिवाय ते मुश्रीफ यांच्या यंत्रणेतील आहेत. कसबा तारळे मधून निवडून आलेल्या आणि गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता डोंगळे, तर चंदगड तालुक्यातून माणगाव जिल्हा परिषद मधून निवडून आलेल्या मानसी भोगन आणि पन्हाळा तालुक्यातून निवडून आलेल्या पूजा पाटील यांचे देखील नाव आघाडीवर येऊ शकते.
तर सर्वाधिक महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मंत्री मुश्रीफ यांचे अत्यंत विश्वासू शोभाताई फराकटे यांचे नाव सुद्धा आघाडीवर आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना अध्यक्षपद देताना विचार करावा लागणार आहे. कारण गोकुळचे अध्यक्षपद कागलमध्ये, जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी कागल मध्ये तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कागल मध्ये घेतले गेले तर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ शकते.
त्यामुळे गडहिंग्लज, राधानगरी, चंदगड किंवा पन्हाळा तालुक्याला अध्यक्षपद देण्याचा विचार मंत्रिमंडळ करतील अशी दाट शक्यता आहे. दरम्यान ज्या पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पक्षाचे अधिक उमेदवार त्याकडे महापौर पद असा फॉर्मयुला ठरवला गेला तर त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेमध्ये महायुती हाच फॉर्मुला निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.