Kolhpur News: भाजप, शिवसेना अन् ठाकरेंच्या सेनेत गटबाजी संपेना, इच्छुकांची मुस्कटदाबी; कोल्हापुरच्या राजकारणात नेमकं काय सुरु?

Kolhpur News : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. नुकतीच प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी पत्ते खोलायला सुरुवात केली आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhpur News: कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. नुकतीच प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी पत्ते खोलायला सुरुवात केली आहे. त्यासाठी अनेकांचे पक्षप्रवेश, प्रबळ असलेला पक्ष, आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या नेत्यांकडे इच्छुकांनी संपर्क ठेवला आहे. निवडणूक ही चार सदस्य पद्धतीनं होणार असल्याने आजूबाजूच्या मतदारसंघातील इच्छुकांना हाताशी धरण्याचं काम सुरू आहे.

मात्र या इच्छुकांची पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे घालमेल वाढली आहे. भाजप, शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील अंतर्गत गटबाजीचे ग्रहण दिवसेंदिवस निवडणुकीच्या निमित्ताने वाढत आहे. त्यामुळे दोन्हीही गटांना धरून राहण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय त्यांची मुस्कटदाबी देखील होताना दिसत आहे.

Kolhapur Municipal Corporation
Waqf Amendment Act: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! सुधारित वक्फ कायद्याच्या तीन तरतुदींना स्थगिती; कोर्टानं नेमकं काय म्हटलंय?

कोल्हापूर भाजपमधील परिस्थिती पाहता यापूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक झाली होती. त्यानंतर भाजपमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून निवडणूक लढवल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील असलेला त्यांचा संपर्क कमी झाला. तर अप्रत्यक्षपणे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आगामी निवडणुकातील सूत्रे गेली आहेत.

महाडिक यांची ताराराणी आघाडी भाजपमध्ये विलीन झाली असली तरी मूळ भाजप पक्ष आणि ताराराणी आघाडी असे दोन्ही गटात विभागल्याचं सध्याचं चित्र आहे. मंत्री पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि महाडिक गट यांच्यातील मतभेद ही वेळोवेळी दिसतात. आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी या दोन्ही गटाची कसरत पहावी लागणार आहे. मूळ भाजपला आणि महाडिक गटांच्या कार्यकर्त्यांना किती संधी मिळणार हे देखील पहावे लागणार आहे.

Kolhapur Municipal Corporation
Kolhapur World Record: कोल्हापूरात घडला विश्वविक्रम! संविधान प्रास्ताविकेचं तब्बल 19 भाषांमध्ये गायन; कसा होता सोहळा?

तर शिवसेनेची परिस्थिती पाहता भाजपच्या ताराराणी आघाडीतून गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम हे शिवसेनेत आले आहेत. यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा निर्णय अंतिम समजला जात होता. मात्र कदम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर शारंगधर देशमुख यांनी देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात कदम आणि देशमुख यांची मोठी राजकीय ताकद आहे. शिवाय पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि क्षीरसागर यांचे देखील सुत सध्या तरी जुळलेले नाही.

तर दुसरीकडे माजी खासदार संजय मंडलिक त्यांनी माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांना हाताशी धरून महापालिकेच्या राजकारणात रस दाखवला आहे. क्षीरसागर, कदम, देशमुख आणि मंडलिक असे तीन घटक शिवसेनेत निर्माण झाले आहेत. त्यामुळं प्रत्येकजण आपापल्याच पदाधिकाऱ्याला संधी कशी मिळणार? यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय पालकमंत्री आबिटकर यांच्याशी जवळीकता केल्यास एका गटाकडून त्या इच्छुकाला रात्रीतून समज दिली जाते. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच मुस्कटदाबी शिवसेनेत होताना दिसत आहे.

Kolhapur Municipal Corporation
Manorama Khedkar: मनोरमा खेडकरांवर पुण्यात गुन्हा दाखल! अपहरण प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा

ठाकरेंच्या शिवसेनेत देखील अंतर्गत गटबाजीचे ग्रहण संपलेले नाही. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यातील मतभेद आज देखील कायम आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रविकरण इंगवले यांना अधिकार दिले असले तरी उपनेते संजय पवार यांनी देखील काही जागांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे समन्वयाची मूठ या ठिकाणी कशी बांधली जाणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसची परिस्थिती पाहता सध्यातरी भक्कम आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे यांची शिवसेनेत उमेदवारीसाठी कसरत करावी लागणार आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सर्वाधिक जागांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. मात्र हे करत असताना मित्रपक्ष कोठेही दुखावणार नाही. याची काळजी काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com