
Summary :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत १४,००० लाडक्या भावांनी बहिणींच्या नावाने निधी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी गैरवर्तन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई व निधी वसुलीचे संकेत दिले आहेत.
महिला व बाल विकास विभागाकडून पुढील १५ दिवसांत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
Pune News : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. पण आता योजनेत लाडक्या भावांचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. तब्बल 14 हजार लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारल्याचे उघड झाल्यानंतर कारवाईची मागणी केली जात होती. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कारवाईचे संकेत दिले होते. त्या प्रमाणे आता महिला व बाल विकास विभागाकडून पुढीस 15 दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. ज्यांनी या योजनेच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. त्यांच्यावर फोजदारी दाखल करण्यासह 11 महिन्याचे पैसैही वसूल केले जाणार आहेत.
तत्कालिन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ही योजना राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे या उद्देशाने आणली होती. आता राज्यात महायुतीचे सरकार आले असून सुमारे 2 कोटीहून अधिक महिलांची या योजनेत नोंदणी झाली होती. पण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, 26 लाख 34 हजार अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे हप्ते रोखण्यात आले आहेत. याचाच अर्थ त्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे. ऐन रक्षाबंधणाच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये संताप पसरला आहे.
अशातच या योजनेत तब्बल 14 हजार 298 पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले होते. तर या पुरुषांनी लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारल्याने अजित पवारांसह बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच या पुरुषांकडून हे पैसे वसुल केले जातील. गरज पडल्यास गुन्हा दाखल करू असाही इशाराही यावेळी देण्यात आला होता.
यानंतर आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसांत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेला 26 लाख लोकांचा डेटा व्हेरिफाय करण्याच्या कामाला गती आली आहे. ज्यामध्ये काही महिलांचे खाते नसल्यामुळे कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे याही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
पण अशा महिलांचा लाडक्या बहिणीचा लाभ सुरूच राहणार आहे. मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल. त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. प्रत्येकी 11 महिन्यांचे 16 हजार 500 असे 14 हजार 298 पुरुषांकडून 23 कोटी 59 लाख 17 हजार रूपये वसूल करण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.