Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'मुळे महायुती सरकारची दमछाक; सणासुदीच्या काळातच लाखो गरीब कुटुंबाचा 'आनंद' हिरावणार

Maharashtra Government : राज्य सरकारकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार नसल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासोबतच, ‘शिवभोजन थाळी’ या स्वस्त दरात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही यावर्षी काटछाट करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Ladki Bahin Yojana Mahayuti Government
Ladki Bahin Yojana Mahayuti Governmentsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. राज्याच्या तिजोरीवर या योजनेमुळे मोठा आर्थिक भार पडत आहे. आता या योजनेमुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या अनेक योजनांना कात्री लागण्याचं वारंवार बोलले जात आहे. अशातच आता सरकारकडून दिला जाणारा 'आनंदाचा शिधा' यावर्षी मिळणार नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सणासुदीला दिला जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ कडे लाखो गरीब कुटुंबांचं लक्ष लागलेलं असतं. आनंदाचा शिधामुळे (Aanandacha Shidha) अनेक गरीब कुटुंबाना दिलासा मिळत असतो. पण यंदाच्या वर्षी सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार नसल्याचं बोललं जात आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीवर 'लाडकी बहीण' योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) प्रचंड ताण येत असल्यामुळे आनंदाच्या शिधा योजनेला यावर्षी अडचणीत आली आहे. शिवभोजन थाळी या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा या योजनेअंतर्गत दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधाचं वाटप केलं जातं. या शिधात 100 रुपयात 4 वस्तू दिल्या जातात. मात्र, या वस्तूंची बाजारात किंमत 500 रुपये इतकी आहे. त्यामुळे उरलेले 400 रुपये राज्य सरकार भरते तो बोजा सरकारवर पडतो. त्यामुळे या दोन्ही योजना बंद करायच्या का? अशी चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Ladki Bahin Yojana Mahayuti Government
Harshwardhan Sapkal: यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटलांसारख्या नेत्यांनी जे केलं, त्याची सुरुवात हर्षवर्धन सपकाळ पुण्यातून करणार

राज्य सरकारकडून दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार नसल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासोबतच, ‘शिवभोजन थाळी’ या स्वस्त दरात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही यंदा काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com